एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेते बॉक्सर दिनको सिंह यांचे वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. २०१७पासून त्यांच्यावर यकृताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी त्यांना करोनाची लागणही झाली होती, पण त्यांनी या विषाणूवर मात केली होती. काही दिवसांपासून सिंग यांच्यावर आयएलबीएस, दिल्ली येथे उपचार सुरू होते.

तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गेल्या वर्षी मणिपूरहून विमानाने दिल्ली येथे आणण्यात आले होते. मात्र कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर कर्करोगावरील उपचार करता आले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णवाहिकेतून २४०० किमी लांब असलेल्या मणिपूरला नेण्यात आले.

हेही वाचा – वीरेंद्र सेहवाग म्हणतो, ‘‘जर सुविधा असत्या, तर मीसुद्धा कमी वयात….”

दिनको सिंह यांनी १९९८मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १९९८मध्ये त्यांना अर्जुन आणि २०१३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहा वेळा विश्वविजेते एम.सी. मेरी कोम आणि एल सरिता देवी यांचे प्रेरणास्थान असलेल्या सिंग यांनी भारतीय नौदलात सेवा केली आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केले, परंतु आजारपणामुळे त्याला घरीच राहावे लागले.

 

हेही वाचा – ‘‘IPLमुळे इंग्लंडचे खेळाडू आपले तळवे चाटतात, मला त्यांचे रंग माहीत आहेत”

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिनको सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रिजीजूंनी ट्वीट केले, ”दिनको सिंह यांच्या निधनामुळे अतिशय वाईट वाटत आहे. ते भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट बॉक्सिंगपटूंपैकी एक होते. १९९८ बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवल्यामुळे भारतात बॉक्सिंग चेन रिअॅक्शन निर्माण झाली. मी त्यांच्या कुटुंबासाठी शोक व्यक्त करतो.”

Story img Loader