David Johnson Passes Away Aged 52 : भारत आणि कर्नाटकचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन (५२) यांचे बंगळुरू येथे निधन झाले. जॉन्सनने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आणि तीन विकेट घेतल्या. १९९६ मध्ये भारतासाठी दोन कसोटी सामने खेळणारा जॉन्सन आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होता आणि तीन दिवसांपूर्वी त्याला स्थानिक रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

डेव्हिड जॉन्सनने ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास –

जॉन्सन ५२ वर्षांचा होता आणि त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या तपशीलानुसार, जॉन्सन, जो त्याच्या घराजवळ क्रिकेट अकादमी चालवत होता. अलिकडच्या दिवसांपासून बरे नव्हते. “आम्हाला माहिती मिळाली की तो त्याच्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडला होता,” केएससीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्यामुळे आता पोलिसांना आत्महत्या केल्याचा संशय असल्याचे बोलले जात आहे.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

जॉन्सनने आपल्या कारकिर्दीत दोन कसोटी आणि ३९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तो कर्नाटक संघाचा महत्त्वाचा सदस्य राहिला आहे. अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद आणि डोडा गणेश यांच्यासह कर्नाटकच्या गोलंदाजीचा तो महत्त्वाचा भाग होता. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि जॉन्सनचा दीर्घकाळचा मित्र गणेश म्हणाला की, “ही धक्कादायक बातमी आहे. कारण आम्ही आमच्या टेनिस क्रिकेटच्या दिवसांपासून जय कर्नाटक नावाच्या क्लबसाठी एकत्र खेळलो आहोत.”

हेही वाचा – “विराट कोहली म्हणेल, तुम्ही मला खाली आणलंत, आता..”,अश्विनने सांगितला टीमच्या क्रमवारीत बदल केल्यास होणारा परिणाम

अनिल कुंबळेची डेव्हिड जॉन्सनसाठी भावनिक पोस्ट –

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने डेव्हिड जॉन्सनबद्दल एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अनिल कुंबळेने लिहिले आहे की, माझा क्रिकेट सहकारी डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाच्या वृत्ताने मी दु:खी झालो आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स डेव्हिड जॉन्सनवर सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – Eng vs Wes T20 World Cup: फिल सॉल्टने चोळले यजमान वेस्ट इंडिजच्या जखमेवर मीठ; इंग्लंडचा दिमाखदार विजय

डेव्हिड जॉन्सनची कारकीर्द –

मात्र, डेव्हिड जॉन्सनची भारतीय क्रिकेटर म्हणून कारकीर्द खूप मोठी राहिली नाही. या खेळाडूने १० ऑक्टोबर ९९६ रोजी दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून पदार्पण केले होते. त्याचबरोबर डेव्हिड जॉन्सनने २६ डिसेंबर १९९६ रोजी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो कधीही टीम इंडियासाठी खेळला नाही. पण देशांतर्गत क्रिकेट आणि इतर लीगमध्ये खेळत राहिले. मात्र, डेव्हिड जॉन्सनच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.