Praveen Kumar Car Accident: भारतीय संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमारचा मेरठ शहरात कारमधून जात असताना मंगळवारी उशिरा अपघात झाला. त्याच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. त्यावेळी प्रवीणसोबत त्यांचा मुलगाही कारमध्ये होता आणि दोघेही या अपघातातून थोडक्यात बचावले. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी कंटेनर चालकाला घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
प्रवीण कुमार ४ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मेरठमधील पांडव नगर येथून त्याच्या लँड रोव्हर डिफेंडर कारने येत होता. यानंतर त्याची कार आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले असता, त्याचवेळी त्याच्या कारला कंटेनरची धडक बसली. यानंतर गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात प्रवीण आणि त्याचा मुलगा थोडक्यात बचावले.
अपघातानंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. या अपघाताबाबत सीओने सांगितले की, प्रवीण कुमार आणि मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रवीण कुमार यांचे घर मेरठ शहरातील बागपत रोडवर असलेल्या मुलतान नगरमध्ये आहे.
२०१२ साली भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला –
प्रवीण कुमारने २०१२ साली भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, त्यानंतर त्याला पुन्हा एकदाही टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही. प्रवीण कुमारने २००७ साली भारताकडून पदार्पण केले. प्रवीण कुमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, एकेकाळी तो टीम इंडियासाठी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये मुख्य गोलंदाजाची भूमिका बजावत होता. २००८ साली जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सीबी मालिका जिंकली, तेव्हा त्या विजयात प्रवीण कुमारने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवीण कुमारला भारतीय संघाकडून ६८ एकदिवसीय, १० टी-२० आणि ६ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये प्रवीणने वनडेत ७७, टी-२०मध्ये ८ आणि कसोटीत २७ विकेट्स घेतल्या. आहेत. याशिवाय ११९ आयपीएल सामन्यांमध्ये प्रवीण कुमारच्या नावावर ९० विकेट्सची नोंद आहे.