भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला जेव्हा २०२१ टी-२० वर्ल्डकपसाठी मेंटॉर म्हणून जाहीर करण्यात आलं तेव्हा क्रिकेटप्रेमींकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. मात्र हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही आणि भारतीय संघ सेमी-फायनलमध्ये पोहोचण्याआधीच बाहेर पडला. टी-२० वर्ल्डकप हा विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा ठरली.

रवी शास्त्री प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने पायऊतार झाले तर दुसरीकडे विराट कोहलीने वर्ल्डकपनंतर आपण टी-२० संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांन धोनीचा अनुभव भारतीय संघाला मदतशीर ठरेल असं सांगत निवड केली होती.

T20 WC : “…म्हणून भारतानं धोनीला मेंटॉर केलं”, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला!

मात्र भारतीय संघाचे माजी गोलंदाज अतुल वासन यांनी CNN-News18 वर बोलताना धक्कादायक दावा केला आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री भारतीय संघाला नियंत्रित करत असल्यानेच धोनीला मेंटॉर म्हणून आणण्यात आलं असं ते म्हणाले आहेत. अतुल वासन यांच्या म्हणण्यानुसार, कोहली आणि रवी शास्त्री यांच्या नेतृत्वातील संघ व्यवस्थापनाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णय प्रक्रियेत संतुलन यावं यासाठी धोनीला आणण्यात आलं होतं.

Ind Vs SA: कर्णधारपदावरुन वादाला तोंड फुटलेलं असताना सचिनचं रोहित शर्माबद्दल मोठं विधान, म्हणाला…

“मी तुम्हाला सांगतो…धोनीला संतुलन ठेवण्यासाठी आणण्यात आलं कारण प्रत्येकाला रवी शास्त्री आणि विराट कोहली पूर्णपणे हाताळत असून आपल्याला हवी तशी निवड आणि निर्णय घेत आहेत असं वाटत होतं,” असं अतुल वासन म्हणाले आहेत.

“ते भारतीय क्रिकेटला नियंत्रित करत होते. त्यामुळे त्यांना (बीसीसीआय) संतुलन राखेल असं कोणाला तरी आणावं असं वाटत होतं. मला वाटतं त्यांनी विश्वचषकात खूप गोंधळ घातला,” असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

Story img Loader