जुन्या वादग्रस्त ट्वीटमुळे इंग्लॅंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनला निलंबित केल्याने क्रिकेटमधील वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रॉबिन्सनचे निलंबन चुकीचे होते, असे सांगितले. या विधानावर भारताचे माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनियर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ”मी वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान जॉनसनबद्दल वाचत आहे. पंतप्रधानांनी अशा प्रकरणावर वक्तव्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित करून योग्य कार्य केले आहे. जर त्याने चूक केली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर खेळाडूंसाठी हे उदाहरण असले पाहिजे”

हेही  वाचा – जेव्हा अँडरसननं ब्रॉडला म्हटलं होतं ‘लेस्बियन’..! ११ वर्षांपूर्वीचं ट्वीट आणणार गोत्यात?

फारुख इंजिनियर बर्‍याच वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना त्यांनी वर्णद्वेषाबाबतचे आपले अनुभव सांगितले. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असताना वर्णद्वेषाचा सामना कसा केला याचा त्याने खुलासा केला. १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला फारुख लँकेशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळले. ते म्हणाले, ”जेव्हा मी इथे पहिल्यांदाच काऊंटी क्रिकेट खेळायला आलो होतो, तेव्हा लोक माझ्याकडे भारतातून आलेला व्यक्ती म्हणून वेगळ्या नजरेने पाहत असत. लँकेशायरकडून खेळत असताना, मी दोनवेळा वांशिक भाष्य केले. त्या टिप्पण्या वैयक्तिक नव्हत्या. मला लक्ष्य केले गेले कारण मी भारतातून आलो आहे आणि माझा बोलण्याचा संदर्भ वेगळा होता.”

”मी देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम केले आहे”

फारुख इंजिनियर पुढे म्हणाले, ”मला वाटते, की माझे इंग्रजी त्यांच्यापेक्षा चांगले आहे. म्हणून त्यांना समजले, की आपण फारुख इंजिनियरसोबत पंगा घेऊ शकत नाही. त्यांना माझा संदेश मिळाला. मी त्यांना जोरदार उत्तर दिले. एवढेच नव्हे, तर मी माझ्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणामुळे स्वत: ला सिद्ध केले. मी देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम केले आणि याचा मला अभिमान आहे.”

हेही वाचा – आरा रा रा खतरनाक..! टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूनं केलाय ‘गजनी’ लूक

आयपीएलबाबत मत

”आयपीएल सुरू झाल्यापासून इंग्लंडचे खेळाडू आमचे तळवे चाटत आहेत. मला आश्चर्य आहे, की केवळ पैशामुळे ते आता आमचे बूट चाटत आहेत. पण सुरुवातीच्या काळात त्याचे रंग काय होते, हे माझ्यासारख्या लोकांना माहिती आहे. आता पैशाच्या बाबतीत त्यांनी आपला दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. इंग्रजी खेळाडूंचे मत आहे की भारतात पैसे कमवता येतात”, अशी आक्रमक प्रतिक्रियाही इंजिनियर यांनी दिली.

Story img Loader