भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पार्थिवचे वडील अजयभाई बिपीनचंद्र पटेल यांचे रविवारी निधन झाले. पार्थिवने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
३६ वर्षीय पार्थिवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या वडिलांचा एक फोटो शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. भारतासाठी २५ कसोटी आणि ३८ एकदिवसीय सामने खेळलेऱ्या पार्थिवच्या वडिलांच्या निधनावर क्रीडा जगताने शोक व्यक्त केला आहे.
२०१९ मध्ये पार्थिव पटेलच्या वडिलांना ब्रेन हेमरेज झाला. त्यावेळी तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. पार्थिव टीम इंडियासाठी कसोटी खेळणारा सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यानंतरही तो संघाच्या आतबाहेर होत राहिला.
हेही वाचा – AUS vs IND : अखेर ‘तो’ विक्रम मोडला..! तिसऱ्या वनडेत टीम इंडियाकडून कांगारूंचं गर्वहरण
दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या पार्थिवने गेल्या वर्षी (२०२०) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पार्थिवने कसोटीत ९३४ धावा केल्या आहेत तर वनडेमध्ये त्याच्या नावावर ७३६ धावा आहेत. पार्थिवने टी-२० मध्ये ३६ धावा केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पार्थिव सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे. तो सध्या आयपीएल २०२१ मध्ये कॉमेंट्री करत आहे.