गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, खेळाडू आणि सेलिब्रेटीही या काळात अडचणीत सापडलेल्यांची मदत करत आहे. टीम इंडियाचा माजी गोलंदाज मुनाफ पटेलही या काळात आपल्या गावी राहून करोनाविरुद्ध लढतो आहे. भरुच जिल्ह्यातील इकहर गावचा रहिवासी असलेल्या मुनाफने गावात कोविड सेंटरची उभारणी केली असून. बाहेरुन गावात आलेल्यांना, तसेच करोनाची सौम्य लक्षणं आढळलेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी मुनाफने या कोविड सेंटरची उभारणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या क्वारंटाइन सेंटरमधल्या लोकांच्या खाण्या-पिण्याची सोयही मुनाफ पटेल बघतो आहे. यासाठी मुनाफ सातत्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या संपर्कात असून गावातील लोकांमध्ये करोनाशी लढताना काय काळजी घ्यायची याचं मार्गदर्शन करतो आहे. या काळात मुनाफ आपल्या गावातील पंचायत ऑफिसमधील अधिकाऱ्यांनाही मदत करतो आहे. मुनाफ पटेलच्या या कामाचं सोशल मीडियावरंही कौतुक होताना दिसत आहे.

आपल्या कारकिर्दीत ग्लेन मॅकग्रा सारखी शैली असलेल्या मुनाफ पटलेने आश्वासक कामगिरी केली. २०११ साली भारतीय संघाला विश्वचषक मिळवून देण्यातही मुनाफ पटेलचा महत्वाचा वाटा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर मुनाफ आपल्या गावी राहतो.