गेल्या काही वर्षांपासून खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणे कठीण होत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढती स्पर्धा, फॉर्मेट कोणताही असो, संघात प्रत्येक स्थानासाठी ३-४ खेळाडू रांगेत उभे असतात. तसेच चांगल्या फॉर्ममध्ये आणि पूर्णपणे तंदुरुस्त राहूनही अनेक खेळाडू टीम इंडियाचा भाग बनू शकत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
असाच प्रकार भारताच्या एका स्टार खेळाडूच्या बाबतीत झाला होता, ज्याला जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी नशिबावर अवलंबून राहावे लागले. याचा खुलासा भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी नुकताच केला आहे.
क्रिकबझशी बोलताना भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी एक खुलासा केला. ते म्हणाले, टीम इंडियाची निवड समिती उमेश यादवला नेहमी ‘मी काय चूक केली?’ हा विचार करायला भाग पाडत. माजी गोलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, “अशी काही उदाहरणे आहेत, जेव्हा उमेश यादव संघाचा भाग नसल्यामुळे निराश झाला होता, विशेषत: अत्यंत चांगली कामगिरी केल्यानंतर.”
उमेश चांगली गोलंदाजी करत होता, पण त्याला सतत डावलले जात होते. भरत अरुणने सांगितले की, संघात निवड न झाल्याने तो (उमेश यादव) अनेकदा नाराज व्हायचा. मग तो माझ्याकडे यायचा आणि मला विचारायचा, ‘मी संघात का नाही? मी काय चुकीचे केले आहे?’
भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले की, “कधी-कधी तो इतका रागावयाचा की, तो माझ्याशी एक दिवसासाठी बोलत नसायचा. पण नंतर तो माझ्याकडे यायचा म्हणायचा, मी समजू शकतो. उमेश एक अद्भुत व्यक्ती आहे, तो अशी व्यक्ती आहे, जी तुम्हाला तुमच्या टीममध्ये ठेवायला नक्कीच आवडेल.”
हेही वाचा – WPL 2023: तारा नॉरिसच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय; आरसीबीला ६० धावांनी चारली धूळ
नरेंद्र मोदींनी पाठवला खास संदेश-
काही दिवसापूर्वी उमेश यादवच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्ह नरेंद्र मोदींनी उमेश यादवच्या कुटुंबासाठी एक पाठवला होता. संदेशात लिहिले होते की, ”उमेशच्या वडिलांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. वडिलांची उपस्थिती आणि त्यांचे प्रेम हा प्रत्येकाच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार असतो.” यासोबतच नरेंद्र मोदींनी उमेश यादव यांच्या कारकिर्दीतील वडिलांच्या त्याग आणि समर्पणाचाही उल्लेख केला. त्याचबरोबर वडिल म्हणून ते सदैव उमेशच्या त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे लिहिले आहे.
उमेश यादवने मानले आभार –
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या संदेशानंतर उमेश यादवने ट्विटरवर आभार मानले आणि लिहिले, “माझ्या वडिलांच्या दुःखद निधनाबद्दल आपल्या शोकसंदेशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. हा संदेश माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे.”