R Sridhar on Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेने अनेक वेळा कसोटीत भारताची कमान सांभाळली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार होता. कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने अनेकवेळा संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये २०१७ आणि २०२०-२१ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा समावेश आहे. नेत्रदीपक आणि ऐतिहासिक दोन्ही विजय रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळाले. भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी रहाणेच्या कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. रहाणे हा कसला कर्णधार होता हे त्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीधरने त्याच्या ‘कोचिंग बियॉन्ड’ या पुस्तकात रहाणेबद्दल एक किस्सा सांगितला. त्याने लिहिले, “कोणतीही चूक करू नका; अजिंक्य काही कमकुवत पात्र नव्हता. सिडनी येथील ड्रममॉयन येथे सराव सामन्यात पृथ्वी शॉ शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत असताना ही घटना घडली. फलंदाजाने स्वीप केला आणि पृथ्वीच्या पायाला चेंडू जाऊन आदळला फलंदाजाने मारलेला फटका त्याला बसला होता. त्यानंतर तो पार्कच्या बाहेर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असताना अजिंक्य पटकन त्याच्या जवळ गेला आणि त्याची सगळे हे पहिले होते. त्याच्या स्लिप पोझिशनवरून तो स्पष्टपणे पाहू शकत होता की पृथ्वीला चेंडू कुठे लागला होता, जो शिन पॅडवर होता.”

हेही वाचा: PSL 2023: “वसीम भाई को गुस्सा बहुत जल्दी आता है”, इंझमाम-उल-हकची मजेशीर टिपण्णी अन् पिकला हशा

श्रीधरन यांनी पुढे लिहिले, “रहाणे त्याच्याकडे गेला आणि ठामपणे म्हणाला, ‘आधी मागे हो कारण तू खूप नखरे करतो आहेस तुला काहीही झालेलं नाही. मैदानावर तुझ्या जागी कोणीही येणार नाही. मला माहित आहे की तुझी काहीच चूक नाही. बॉल तुझ्या शिन पॅडला लागल्याचे मी पाहिले. तुम्ही कदाचित परत जाण्याची संधी शोधत असाल, पण तसे होणार नाही. शॉर्ट लेगवर जा आणि फिल्डिंग कर. पृथ्वीला माहित होते की त्याचा कर्णधार त्याला हे सगळ सांगत आहे. त्याचबरोबर अजिंक्यने इतरांना देखील’ सांगितले की, “मला कुठलीही सबब चालणार नाही. त्यावेळी मला खूप दिलासा मिळाला कारण मला पर्यायी खेळाडू म्हणून जायचे होते कारण त्या सामन्यासाठी आमच्याकडे फक्त ११ खेळाडू होते. अशावेळी प्रशिक्षक म्हणून नाही तर खेळाडू म्हणून मला जावे लागले असते.”

हेही वाचा: Jyotiraditya Scindia: ‘एक शॉट अन् थेट गाठलं हॉस्पिटल! ज्योतिरादित्य सिंधियांच्या शॉटमुळे भाजप कार्यकर्ता जखमी

कसोटी कर्णधार म्हणून रहाणेचा विक्रम चांगला आहे

अजिंक्य रहाणेने आतापर्यंत एकूण ६ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने ४ जिंकले आहेत आणि २ सामने अनिर्णित राहिले आहेत. कसोटी कर्णधार म्हणून त्याची विजयाची टक्केवारी ६६.६६ होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये त्याने भारताचे नेतृत्व केले असून त्यातील ३ सामन्यांत संघाने विजय मिळवला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former indian coach revealed the captaincy of ajinkya rahane told how he showed emphasis on prithvi shaw avw