विश्वविजेते कप्तान आणि दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांनी केली आहे. कर्नाटकच्या डोडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही इच्छा व्यक्त केली. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला सचिन तेंडुलकर हा एकमेव क्रिकेटपटू आहे. १९८३च्या विश्वचषक विजेतेपदाने मास्टर ब्लास्टरला क्रिकेट खेळण्यास प्रेरित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०११ मध्ये भारताने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला, तेव्हा सचिन तेंडुलकरलाच वर्ल्ड चॅम्पियन झाल्याची जाणीव झाली. माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांचे मत आहे, की १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे. या विजेतेपदामध्ये कपिल देव हे भारतासाठी महत्त्वाचे खेळाडू होते.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करून १९८३चा विश्वचषक जिंकला होता. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ १८३ धावांवर ऑलआऊट झाला. कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी ३८ धावा केल्या आणि ते संघासाठी सर्वोत्तम धावा करणारे खेळाडू ठरले.

हेही वाचा – ‘‘…अशा गोष्टी मनाला लागतात”, विराटच्या हकालपट्टीवरून निवड समितीवर भडकले मदन लाल!

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आणि दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला १४० धावांवर रोखून विजेतेपद पटकावले. मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, त्यांनी ७ षटकांत १२ धावांत ३ बळी घेतले. अमरनाथ यांनी फलंदाजीत २६ धावांचे योगदान दिले. कपिल देव यांच्या शानदार झेलसाठीही हा सामना लक्षात राहिला आहे. कपिल देवने मिडविकेटवरून धावताना व्हिव्ह रिचर्ड्स यांचा अप्रतिम झेल घेतला.