K Srikanth asked a question to those trolling Virat Kohli for a century: भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आपली चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. गुरुवारी, १९ ऑक्टोबर रोजी पुण्यात खेळल्या गेलेल्या १७ व्या सामन्यात बांगलादेशचा पराभव ७ गडी राखून पराभव केला. तसेच या स्पर्धेतील आपला सलग चौथा विजय नोंदवला. या सामन्यात सर्वप्रथम सर्व भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांच्यानंतर विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत कारकिर्दीतील ४८ वे शतक झळकावले. शतकानंतर विराटला ट्रोल करणाऱ्यांना के. श्रीकांत यांनी फटकारले.
या सामन्यात विराटने नक्कीच आपल्या बॅटने शतक झळकावलं, पण तरीही मॅच संपल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली. खरे तर कोहली त्याच्या शतकाच्या जवळ येत असताना त्याने अनेक एकेरी घेण्यास नकार दिला आणि स्ट्राईक स्वतःकडेच ठेवली. ज्याने त्याला शतक झळकावण्यात मदत झालसी. विराटला असे करताना पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला स्वार्थी म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली.
के. श्रीकांत यांनी विराट कोहलीबद्दल केली खास पोस्ट –
दरम्यान, टीम इंडियाचा माजी क्रिकेटर के. श्रीकांत यांना सोशल मीडियावर विराटला ज्या प्रकारे ट्रोल केले जात आहे. ते आवडले नाही. त्याने आपल्या एक्सवर विराटच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे. श्रीकांत यांनी लिहिले, “विराटने जे केले त्यात चूक काय? ज्यांना क्रिकेट समजत नाही, अशा लोकांना माझा प्रश्न आहे. लक्षात घ्या की विश्वचषकात शतक ठोकणे ही मोठे यश आहे. विराट कोहलीला या आणि बरेच काही गोष्टींसाठी हक्क आहे, अशा टीम मॅनचे अभिनंदन केले पाहिजे. चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केएल राहुलही कौतुकास पात्र ठरला होता. आपण या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ हजार धावा पूर्ण –
यासह विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर २५९२३ धावा होत्या. आता २६ हजार धावा करणारा तो जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय विराट कोहलीने सर्वात जलद २६ हजार धावा करण्याचा विक्रमही केला आहे. विराट कोहलीने वनडे विश्वचषकात तिसरे शतक झळकावून शिखर धवनची बरोबरी केली. या यादीत रोहित शर्मा ७ शतकांसह अव्वल स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने ६ आणि सौरव गांगुलीने ४ शतके झळकावली आहेत.