संपूर्ण जगभरात आज मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आई या दोन शब्दांमध्ये आपल्या प्रत्येकाचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. आपलं मुल मोठं होऊन त्याने नाव कमवावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आजच्या खास दिवशी आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनने आपल्या आईचा व स्वतःचा बालपणीचा फोटो पोस्ट करत खास शब्दांत आईला शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्यासाठी आतापर्यंत तू जे काही केलंस त्यासाठी तुझे खरंच आभार, तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही या शब्दांसह सचिनने आपल्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
कशी झाली मदर्स डेची सुरुवात ?
आईला सन्मान देणारया मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुलं जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मदर्स डे ?
९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल. त्यानंतर मदर्स डे अमेरिकासह इतर देशांमध्ये याचदिवशी साजरा केला जाऊ लागला.