Virender Sehwag Pakistan Zindabhaag Have a safe flight back home: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेच्या संघाला गुरुवारी न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या पराभवानंतर न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे, तर पाकिस्तान संघाचेही उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग विश्वचषकाच्या उपांत्य-फेरीच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर चांगलाच आनंदी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का गुरुवारी (९ नोव्हेंबर) रात्री बसला, जेव्हा न्यूझीलंडने श्रीलंकेवर ५ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. जर न्यूझीलंडने मोठ्या फरकाने विजय नोंदवला नसता, तर पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी काही आशा उरल्या असत्या, परंतु आता स्पर्धेतील त्यांचा पुढील प्रवास अशक्य आहे. कारण त्यांना उपांत्य फेरीत जाण्यासाठी इंग्लंडविरुद्ध २८७ धावांनी विजय मिळवावा लागेल. तसेच धावांचा पाठला करताना ६ षटकांत विजय नोंदवावा लागेल, जे जवळपास अशक्य आहे.

वीरेंद्र सेहवागने एक्सवरप एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ‘बाय बाय पाकिस्तान’ असे लिहिले आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये वीरेंद्र सेहवागने लिहिले, “पाकिस्तान जिंदाभाग! घरी परतण्यासाठी सुरक्षित उड्डाण करा.” वीरेंद्र सेहवाग इथेच थांबला नाही, त्याने तेच ट्विट रिट्विट करत पुन्हा टोमणा मारला. वीरेंद्र सेहवागने लिहिले, “पाकिस्तानची खास गोष्ट म्हणजे पाकिस्तान ज्या संघाला सपोर्ट करतो, तो संघ पाकिस्तानसारखा खेळू लागतो.” त्याने या पोस्टसोबत हसणारा इमोजी शेअर केला आणि ‘सॉरी श्रीलंका’ असेही लिहिले.

हेही वाचा – SA vs AFG: अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान संघ बिर्याणीमुळे चर्चेत –

खरंतर, पाकिस्तानचा संघ या विश्वचषकात आपल्या खेळापेक्षा बिर्याणीमुळे जास्त चर्चेत राहिला आहे. जेव्हा-जेव्हा कर्णधार बाबर आझम पत्रकार परिषदेला सामोरे गेला, तेव्हा त्याला भारतीय बिर्याणीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. टीम हैदराबादमध्ये असताना तिथल्या बिर्याणीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. इतकंच नाही तर पाकिस्तानची टीम कोलकात्याला गेली, तेव्हा त्यांनी तिथे ऑनलाइन बिर्याणी ऑर्डर केली. सलग काही सामने गमावल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने संघाच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या आहारावर निशाणा साधला होता. तो म्हणाला होता की, पाकिस्तानी खेळाडू प्रत्येकी आठ किलो मांस खात असल्याचे दिसते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former indian player virender sehwag has mocked pakistan for their elimination from the icc world cup 2023 vbm
Show comments