क्रिकेटच्या पंढरीत आपल्या पदार्पणाच्या कसोटी दुहेरी शतक ठोकल्यानंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डेव्हन कॉनवे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या धाकड खेळीने कॉनवेने अनेक विक्रम मोडले आहेत. आपल्या पदार्पण कसोटीतच दुहेरी शतक ठोकणारा कॉनवे हा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज आहे. त्याच्यापूर्वी अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा फलंदाज हा मॅथ्यू सिन्क्लेअर होता. तत्कालिन द्विशतकामुळे सिन्क्लेअरही कॉनवेसारखा चर्चेचा विषय ठरला होता, पण आज त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मॅथ्यू सिन्क्लेअरकडे सध्या पोटापाण्याची नीट सोयही नसून त्याची पत्नी टीनादेखील त्याला सोडून गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू मॅथ्यू सिन्क्लेअर

न्यूझीलंडकडून ३३ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या मॅथ्यू सिन्क्लेअरने या प्रकारात १६३५ धावा केल्या आहेत. त्याने २६ डिसेंबर १९९९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले आणि या सामन्यात दुहेरी शतक झळकावले. इतकेच नव्हे, तर सिन्क्लेअरने त्याच्या कसोटी कारकीर्दीत ३ शतके ठोकली, ज्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. सिन्क्लेअरने ५४ एकदिवसीय सामन्यात १३०४ धावा केल्या आहेत, त्यामध्ये त्याने २ शतके आणि ८ अर्धशतके समाविष्ट आहेत.

हेही वाचा – टीम इंडियाचे माजी हॉकीपटू उस्मान खान यांचे कर्करोगामुळे निधन

निवृत्तीनंतर सिन्क्लेअरचे बदलले आयुष्य

निवृत्तीनंतर मॅथ्यू सिन्क्लेअरचे आयुष्य पूर्णपणे बदलले. सिनक्लेअरने एका मुलाखतीत सांगितले, की निवृत्तीनंतर त्याच्याकडे नोकरी नाही आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी न्यूझीलंड सरकारच्या बेरोजगारी फंडावर अवलंबून आहे. सिन्क्लेअरकडे कोणतीही पदवी नव्हती, यामुळे त्याला कोणतीही नोकरी मिळालेली नाही. आर्थिक अडचणींमुळे सिन्क्लेअर आणि त्यांची पत्नी भांडण करू लागले. सिन्क्लेअरवरही घरगुती हिंसाचाराचा आरोप होता आणि शेवटी त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला.

आज मॅथ्यू सिन्क्लेअर रिअल इस्टेट कंपनीत काम करतो आणि त्याला कमिशनच्या आधारावर मोबदला मिळतो. म्हणजे जेव्हा सिन्क्लेअर केवळ घर विकेल तेव्हाच त्याला पैसे मिळतात. आपल्या पदार्पणाच्या कसोटीत दुहेरी शतक ठोकणारा खेळाडू असेच जीवन जगतो, यावर विश्वास ठेवणे खरोखर कठीण आहे.