ICC Invites World Cup Winning Captains For World Cup 2023 Finals: भारतात खेळली जाणारी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर चौथा देखील जवळजवळ निश्चिक झाला आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना १५ तारखेला तर दुसरा १६ नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर, अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, ज्यासाठी सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना आयसीसीने आमंत्रित केले आहे, मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यात सहभागी होऊ शकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९२ मध्ये पाकिस्ताला पहिला एकदिवसीय विश्वचषक इम्रान खानने जिंकून दिला होता. मात्र, या पाकिस्तानचा संघाचा माजी कर्णधार इम्रान खान २०२३ मध्ये भारतात खेळला जाणारा एकदिवसीय विश्वचषकचा अंतिम सामना पाहू शकणार नाही. कारण त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. इम्रान खानला आयसीसीने विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. वास्तविक, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत, त्यामुळे ते स्पर्धेच्या अंतिम सामना पाहण्याासाठी भारतात येऊ शकणार नाही.

उपांत्य फेरीसाठी तीन संघ झाले निश्चित –

आतापर्यंत तीन संघ २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. सर्वप्रथम यजमान भारताने एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेने पात्रता मिळवली. त्यानंतर पाच वेळा विश्वविजेता असलेला ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला. न्यूझीलंडने चौथ्या उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर न्यूझीलंडला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.

हेही वाचा – SA vs AFG: उपांत्य फेरीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला धक्का! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात लुंगी एनगिडीला झाली दुखापत

नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना –

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. उपांत्य फेरीतील विजयी दोन्ही संघ रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी विजेतेपदाच्या लढतीसाठी आमनेसामने असतील. २०१९ च्या स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला होता. ज्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pakistan captain imran khan will not be able to attend the odi world cup 2023 final vbm
Show comments