पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफ यांनी विराट कोहलीबद्दल खळबळ माजवणारे विधान केले आहे. बांगलादेशमध्ये खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७२वे शतक झळकावले. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर आहे, ज्याच्या नावावर १०० आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाची नोंद आहे. अशातच पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफ यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य जे चर्चेचा विषय बनले आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल अशी टिप्पणी केली आहे, ज्यामुळे भारतीय चाहते संतापले आहेत. रशीद लतीफची ही कमेंट भारतीय चाहते कधीही विसरणार नाहीत. रशीद लतीफने कोहलीला टोला लगावत म्हटले आहे की, भारतीय चाहत्यांना विराटच्या १०० शतकांची गरज नाही, तर विश्वचषक ट्रॉफीची गरज आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला यश येत नाही
रशीद लतीफ म्हणाला, “तुम्ही आर्थिकदृष्ट्या पाहिले तर भारतीय क्रिकेट आणि आयपीएलने खूप प्रगती केली आहे, पण आता मीडिया आणि चाहत्यांकडून दबाव आहे की भारतीय संघाने कोणतीही मोठी आयसीसी ट्रॉफी जिंकली पाहिजे.” रशीद लतीफ म्हणाला, पुढे तो म्हणाला की “टीम इंडियाला २०२२चा साधा आशिया चषक सुद्धा जिंकता आला नाही. याशिवाय भारताला २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ विश्वचषक, २०२१ टी-२० विश्वचषक आणि २०२२ चा टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. १०० शतकांचे स्वतःचे महत्त्व आहे, परंतु या क्षणी भारताला विश्वचषक जिंकणे आवश्यक आहे.”
भारतीय चाहते संतापले!
पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “विराट कोहली हवी तेवढी शतके करू शकतो, पण भारतीय चाहत्यांना वर्ल्ड कप ट्रॉफीची गरज आहे.” विराट कोहलीने १०० शतके ठोकली की २०० शतके ठोकली, भारतीय चाहत्यांना याची पर्वा नाही. रशीद लतीफ म्हणाले, “भारतीय चाहत्यांना विराट कोहलीच्या १०० शतके किंवा २०० शतकांच्या विक्रमाची पर्वा नाही, तर त्यांना भारताला विश्वचषक ट्रॉफी का जिंकता येत नाही याची चिंता आहे.”