नवी दिल्ली : भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाल्यास आपण त्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे संकेत तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात दिले होते. त्याच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने कर्णधारपदामागे धावू नकोस, असा सल्ला बुमराला दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या महिन्यात दिलेल्या मुलाखतीत बुमराने पॅट कमिन्स, कपिल देव आणि इम्रान खान यांचे उदाहरण देताना गोलंदाजही यशस्वी कर्णधार होऊ शकतात हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ‘‘गोलंदाज खूप हुशार असतात असे माझे प्रामाणिक मत आहे. आम्हाला फलंदाजांना बाद करण्यासाठी विविध योजना आखाव्या लागतात. आता मैदाने छोटी होत असून बॅट अधिक मोठ्या आणि चांगल्या होत आहेत. त्यामुळे यशस्वी ठरण्यासाठी गोलंदाजाला खूप विचार करावा लागतो. कर्णधारपदाचेही तसेच आहे. तुम्हाला धाडसी निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठी तुम्ही हुशार असणे आवश्यक आहे. त्यामुळेच गोलंदाज चांगले कर्णधार होऊ शकतात असे मला वाटते,’’ असे बुमराने नमूद केले होते. तसेच देशाचे नेतृत्व करणे हे प्रत्येकच खेळाडूचे स्वप्न असते आणि आपणही त्याला अपवाद नसल्याचे बुमराने सांगितले होते.
हेही वाचा >>> 39 Runs In An Over: एका षटकात ३९ धावा… ‘या’ फलंदाजाने मोडला युवराज सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड, एका ओव्हरमध्ये ६ षटकार
त्याच्या या वक्तव्यावर भाष्य करताना बासित अली म्हणाला, ‘‘बाबर आझमलाही कर्णधारपद आवडते, पण त्याचे काय झाले हे सर्वांनीच पाहिले. माझ्या मते, बुमराने कर्णधारपदाच्या मागे धावू नये. तो उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि त्याने त्यावरच लक्ष केंद्रित करावे.’’
‘‘यशस्वी कर्णधारांची उदाहरणे देताना बुमराने कपिल देव आणि इम्रान खान यांची नावे घेतली. मात्र, हे दोघे केवळ गोलंदाज नाही, तर अष्टपैलू होते. हा फरक समजून घेणे आवश्यक आहे. बुमराने पॅट कमिन्सचेही नाव घेतले. कमिन्सने कर्णधार म्हणून केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहेच, पण वेगवान गोलंदाज चांगले कर्णधार किंवा प्रशिक्षक झाल्याची उदाहरणे फार कमी आहेत. माझ्या बुमराला शुभेच्छाच असतील. पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे नेतृत्व बुमराकडे सोपवले जाऊ शकेल. त्याला संधी मिळाली तर उत्तम, पण त्याने स्वत:हून तशी मागणी करू नये,’’ असेही बासित म्हणाला.
बुमराने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध एका कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. त्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. तसेच गेल्या वर्षी आयर्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत बुमराने भारताचे कर्णधारपद भूषवले होते. भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-० अशी जिंकली होती.
तिन्ही प्रारूपांत मिळून सर्वोत्तम गोलंदाज पॉन्टिंग
गेल्या पाच-सहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून सर्वोत्तम गोलंदाजाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा जसप्रीत बुमराला पर्याय नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. ‘‘एक-दोन वर्षांपूर्वी बुमराला काही दुखापती झाल्या आणि त्यानंतर तो पुन्हा सर्वोत्तम कामगिरी करू शकेल का, असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, माझ्या मते, दुखापतीतून सावरून पुनरागमन केल्यापासून त्याच्या गोलंदाजीत अधिकच सुधारणा झाली आहे. ‘आम्हाला बुमराविरुद्ध खेळायला आवडत नाही. तो कधी काय करेल सांगता येत नाही. त्याच्याविरुद्ध धावा करणे फार अवघड आहे,’ असे अन्य संघांतील खेळाडू सांगतात. यावरूनच बुमराच्या गुणवत्तेचा प्रत्यय येतो. इन स्विंग असो, आऊट स्विंग असो की सीम गोलंदाजी… बुमराच्या ताफ्यात सर्वच चेंडू आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज मी पाहिलेला नाही,’’ अशा शब्दांत पॉन्टिंगने स्तुती केली.