पाकिस्तानचा माजी फलंदाज इम्रान नाझीरने एका मुलाखतीदरम्यान धक्कादायक दावा केला आहे. पाकिस्तानसाठी ८ कसोटी, ७९ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळलेल्या नाझीरने दावा केला आहे की, त्याला विष (पारा) देण्यात आले होते, ज्याचा शरीरावर हळू-हळू परिणाम होतो आणि सांधे खराब होतात. सुमारे ८ ते १० वर्षांपासून त्यांनी सांध्यांसाठी उपचार घेतले. कारण त्याला अंथरुणाला खिळून पडण्याची भीतीही वाटत होती, असे नजीरने सांगितले. नाझीर म्हणाला की, आपण काय खाल्ले आहे याबद्दल तो सांगू शकत नाही, कारण विष लगेच प्रभाव करत नव्हते, परंतु एक संथ प्रक्रिया होती.
नादिर अलीच्या शोमध्ये नाझीर म्हणाला, “जेव्हा माझ्यावर अलीकडेच उपचार झाले, एमआरआय आणि सर्व काही तपासले, तेव्हा मला विषबाधा झाल्याचे विधान जारी करण्यात आले. हे एक मंद विष आहे जे तुमच्या सांध्यांना नुकसान पोहोचवते. माझ्या सांध्यांवर ८ ते १० वर्षे उपचार करण्यात आले. माझे सर्व सांधे खराब झाले होते. त्यामुळे मला ६ ते ७ वर्षे झगडावे लागले. पण मग मी तेव्हा देवाला प्रार्थना करायचो, मला अपंग बनवू नको आणि त्याचे आभार असे काहीही घडले नाही.”
तो पुढे म्हणाला, “मी चालत राहायचो आणि जेव्हा लोक विचारायचे की मी छान दिसत आहे. मला अनेक लोकांवर संशय यायचा. पण मी कधी आणि काय खाल्ले ते कळू शकले नाही. कारण विषाचा परिणाम लगेच होत नाही. तो वर्षानुवर्षे तुम्हाला मारतो. ज्याने माझ्याशी हे केले, त्याच्याबद्दल आता मी वाईट विचार करत नाही. कारण मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा व्यक्ती महान असतो.”
हेही वाचा – IPL 2023: आठवड्याभरात केकेआरसाठी तिसरा मोठा धक्का; आता ‘हा’ धडाकेबाज फलंदाज झाला जखमी
नाझीरने सांगितले की, त्याने आपली सर्व कमाई उपचारावर खर्च केली आणि कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. फक्त एकमेव शाहिद आफ्रिदी मला वाचवण्यासाठी आला होता. आफ्रिदीने केवळ मानसिक आधारच दिला नाही, तर त्याने मला आर्थिक मदतही केली, असे नाझीरने सांगितले.
तो म्हणाला, “मी माझी सर्व बचत उपचारासाठी लावली. शेवटी एका उपचाराची गरज होती, ज्यामध्ये शाहिद आफ्रिदीने खूप मदत केली. त्याने मला गरजेच्या वेळी मदत केली. आफ्रिदीला भेटलो तेव्हा माझ्याकडे काहीच उरले नाही. डॉक्टरांना एका दिवसात पैसे मिळाले. कितीही पैसे लागतील, पण माझा भाऊ बरा झाला पाहिजे, असे तो म्हणाला. त्यासाठी सुमारे ४० ते ५० लाख रुपये खर्च आला.”