पाकिस्तानच्या संघाला अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या सात सामन्यांच्या टी२० मालिकेत (पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड) ३-४ असा पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम टीकेचा बळी ठरला. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी त्याची तुलना विराट कोहलीशी करत त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचा माजी फलंदाज सलमान बटनेही त्याला चांगलेच सुनावले आहे. “पाकिस्तानात बाबर आझमवर खूप टीका केली जाते, तर भारतातील लोक विराट कोहलीवर तितकी टीका करत नाहीत”, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर माजी क्रिकेटर सलमान बट्टने रमीज राजा यांच्यावर निशाणा साधला आहे. या विधानाला काही अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
वास्तविक बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान पाकिस्तानसाठी सातत्याने धावा करत आहेत. मात्र, या फलंदाजांचा स्ट्राईक रेट तितकासा चांगला नाही. त्यामुळे पाकिस्तानी चाहते त्याच्यावर जोरदार टीका करतात. अलीकडेच पाकिस्तानलाही इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. याच कारणामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानवर बरीच टीकाही केली आणि टी२० विश्वचषक संघावरही प्रश्न उपस्थित केले.
हेही वाचा : “भारताने आम्हाला आदर देण्यास…”; PCB चे अध्यक्ष रमीज राजाचे भारतीय संघाबद्दल मोठे विधान
रमीज राजा यांच्या मते, पाकिस्तान संघावर अधिक टीका होत आहे. यासाठी त्यांनी टीम इंडिया आणि विराट कोहलीचे उदाहरण दिले. रमीज राजाच्या मते, भारतीय चाहते त्यांच्या खेळाडूंवर तितकीशी टीका करत नाहीत. ते म्हणाला की, “भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, यासाठी त्याच्यावर खूप टीका व्हायला हवी होती, पण त्याचे चाहते आणि मीडियाने तसे केले नाही. विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यावर त्याचे चाहते संपूर्ण आशिया चषक विसरले. आपण हे कधी करू शकतो का? बाबर आझमने शतक ठोकले असे आपण म्हणतो पण त्याचा स्ट्राईक रेट फक्त १३५ होता.”
सलमान बटने टीका केली
रमीज राजांच्या या वक्तव्यावर सलमान बटने टीका केली आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला,“आपण योग्य उदाहरण देऊ शकत नाही. विराट कोहली हा जगातील अव्वल खेळाडू आहे. त्याच्या नावावर ७० हून अधिक शतके आहेत. माझ्या मते रमीझ राजा खूप निराश आहे. कदाचित काही दिवसांनी इतरांना मिळेल अशी काही बातमी त्यांना मिळाली असेल. तो इतर अनेक गोष्टींबद्दल बोलला ज्यांना मुळीच तर्क नव्हता.”