भारत आणि श्रीलंका संघात वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटने शतक झळकावून २०२३ वर्षाची सुरुवात धमाकेदार केली. या सामन्यात विराट कोहलीने ११३ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर विराट कोहलीबाबत सध्या समीक्षकांच्या एका गटात चर्चा आहे, त्यांच्या मते अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या संघांविरुद्धच शतक झळकावतो आहे. यावर माजी खेळाडू सलमान बटने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया चषक २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावल्यानंतर विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये आहे. विराटने आशिया चषकापूर्वी क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर जोरदार पुनरागमन केले होते. विराटने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले तेव्हा काही समीक्षक म्हणत आहेत की कोहलीचे शतक अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या संघांविरुद्ध आले आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने विराटची बाजू मांडली आहे.
सलमान बटने आपल्या यूट्यूबवर म्हटले आहे की, ”विराट कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले. त्याचे गोलंदाजी आक्रमण चांगले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध किती फलंदाजांनी शतक केले? अफगाणिस्तान हा कमकुवत संघ असल्याचे लोक म्हणतात आणि विराटने सपाट ट्रॅकवर शतक ठोकले. त्या खेळाडूने ७३ वेळा अशी कामगिरी केली आहे. काही चाहते अशा गोष्टी कशा करतात हे मला समजत नाही. विराट हा क्रिकेटमधील प्रतिभावंत आहे.”
हेही वाचा – Dravid Birthday Celebration: कोलकात्यात पोहोचताच राहुल द्रविडला मिळाले सरप्राईज; पाहा सेलिब्रेशनचा VIDEO
याशिवाय सलमान बट टी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या इनिंगबद्दलही बोलला. तो म्हणाला, ”टी-२० विश्वचषकात विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्धची खेळी खूप खास होती. असे खेळणे सोपे नाही. विशेषतः जेव्हा तुमचा फॉर्म तितकासा खास नसतो. अशा खेळी खेळाडूला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.”