पाकिस्तानचे महान माजी फिरकीपटू अब्दुल कादिर यांचे कार्डियक अटॅकने निधन झाले आहे. ते ६३ वर्षाचे होते. १५ सप्टेंबर १९५५ रोजी कादिर यांचा लाहौर येथे जन्म झाला होता. कादिर यांनी आपल्या १६ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ६७ कसोटी, १०४ एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केलं आहे. कसोटीमध्ये २३६ आणि एकदिवसीय सामन्यात १३२ बळी घेतले आहेत. कादिर यांनी पाच एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाचे कर्णधारपदही भूषावलं आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये कादिर यांना टॉप स्पिन आणि गुगली गोलंदाजीमुळे ओळखले जात होते. आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे त्यांना डान्सिंग बॉलर म्हणूनही ओळखलं जातं होतं. १९८० च्या दशकात पाकिस्तानच्या यशामध्ये कादिर यांचा मोलाचा वाटा होता. कादिर यांनी शेन वॉर्न आणि मुश्‍ताक अहमदसारख्या दिग्गज गोलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीचे बारकावे शिकवले आहेत.


इंग्लंड संघाविरोधात कादिर यांनी नेहमीच आपला खेळ उंचावला आहे. १९८७ मध्ये मायदेशात इंग्लंडविरोधात झालेल्या तीन कसोटी सामन्यात ३० बळी घेतले होते. यावेळी कादिर यांनी ५६ धावांच्या मोबदल्यात ९ फलंदाजांना बाद केलं होतं. कादिर यांनी दोन विश्वचषकात पाकिस्तान संघाचे नेतृत्व केलं आहे.

Story img Loader