Sikandar Bakht accused Rohit Sharma of cheating in toss: विश्वचषकातील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमधील गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तान क्रिकेटमध्ये दोन मोठे बदल झाले आहेत. बाबर आझमने सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले आहे, तर माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजची पाकिस्तान क्रिकेटच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र यानंतरही पाकिस्तानींना पराभव पचवता आलेला नाही आणि ते थेट भारतावर दोषारोप करत आहेत. पाकिस्तानचा माजी गोलंदाज सिकंदर बख्तने आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नाणेफेकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माच्या नाणेफेकीवर आरोप –

वास्तविक, सिकंदर बख्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका टीव्ही चर्चेत भारतीय संघ नाणेफेकीत फसवणूक करत असल्याचा आरोप करत आहे. ‘रोहित शर्माजेव्हा रोहित शर्मा नाणेफेक करतो, तेव्हा तो जाणीवपूर्वक नाणे दूर फेकतो. त्यानंतर विरोधी संघाचे कर्णधारही जाऊन कॉल योग्य की अयोग्य हे तपासत नाहीत’, असे बख्तने म्हटले आहे. सिकंदर बख्तच्या या बोलण्यानंतर, व्हिडीओमध्ये रोहित शर्माच्या टॉसच्या काही क्लिप जोडल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये टॉस रोहितपासून दूर पडताना दिसत आहे.

नाणे फक्त रेफरी पाहतो –

सिकंदर बख्तचा हा प्रश्न मजेदार आहे. कारण नाणेफेकीच्या वेळी नाणे पाहणे हे मॅच रेफरीचे काम आहे. नाणे फेकल्यानंतर अनेकदा दोन्ही संघांचे कर्णधार आपापल्या जागी राहतात आणि नाणे फक्त रेफ्रीच बघतात. मग रेफ्री सांगतो की कोणत्या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि नंतर नाणेफेक जिंकणारा कर्णधार तो प्रथम फलंदाजी करणार की प्रथम गोलंदाजी करणार याचा निर्णय सांगतो. एकप्रकारे पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने रेफ्रींवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: विजयानंतर शुबमन गिलने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विराटकडून प्रेरणा मिळते आणि रोहितकडून…’

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारतीय संघावर असे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा याने आयसीसी भारतीय गोलंदाजांना वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू देत असल्याचा आरोप केला होता. तो चेंडू खूप स्विंग होत आहे. ६६ वर्षीय सिकंदर बख्त हा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. बख्तने पाकिस्तानकडून १०० आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. त्याने १९७६ मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर १९८९ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pakistani cricketer sikandar bakht accused rohit sharma of cheating in toss in world cup 2023 vbm