कराची : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर बाबर आझमने पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडावे आणि आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे, असे मत शोएब मलिक, कमरान अकमल आणि अब्दुल रझाक यांसारख्या काही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे.बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत नऊपैकी केवळ चार सामने जिंकता आले. त्यामुळे पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यातच बाबरला कर्णधार आणि फलंदाज म्हणून प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे आता त्याचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.‘‘मी बाबरच्या विरोधात नाही, पण आता त्याने ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा >>> IND vs NZ: “ही मुले खूप हुशार आहेत, आम्ही त्यांच्याइतके…”, सेमीफायनलआधी कपिल देव यांनी टीम इंडियाचे केले कौतुक

फलंदाज म्हणून त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. कर्णधारपदाचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्णधार आणि प्रमुख फलंदाज या दोन्हीचे दडपण हाताळण्यासाठी आपण सक्षम आहोत का, याचा त्याने निश्चित विचार केला पाहिजे,’’ असे मलिक म्हणाला.बाबर २०१९ पासून पाकिस्तानचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चार वर्षे पुरेशी असतात. मात्र, बाबरने निराशा केली आहे असे रझाकला वाटते. ‘‘कर्णधार म्हणून तुम्ही पक्षपात न करता निर्णय घेतले तर तुम्हाला यश मिळतेच.