Asia Cup 2023 Wasim Akram IND vs PAK: बुधवारपासून आशिया चषकाची सुरुवात पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील मुलतानमधील पहिल्या सामन्याने होत आहे, परंतु सर्वांच्या नजरा २ सप्टेंबर रोजी कँडीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर असतील. “भारत असो वा पाकिस्तान किंवा श्रीलंका, प्रत्येक गोलंदाज १० षटके टाकण्यास सक्षम आहेत की नाही हे तपासायला आवडेल कारण आजकाल त्यांना एका सामन्यात चार षटके टाकण्याची सवय झाली आहे,” असे अक्रम एका कार्यक्रमात पत्रकारांशी गप्पा मारताना म्हणाला. त्यावेळी त्याला यंदाचा आशिया चषक २०२३ कोण जिंकणार? असे विचारण्यात आले. त्यावर त्याने मोठे विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम म्हणाला, “आशिया चषक२०२३ गेल्या वर्षी टी२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, मात्र यावेळी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. माझ्या मते हे आशियाई क्रिकेट परिषदेचे स्वागतार्ह पाऊल आहे. एसीसीने (एशियन क्रिकेट कौन्सिल) ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये आशिया चषक आयोजित करणे चांगली कल्पना आहे कारण, त्यानंतर लगेचच विश्वचषक होणार आहे.”

पत्रकारांनी यानंतर लगेचच वसीमला प्रश्न विचारला, “यावेळी कोणता संघ आशिया चषक जिंकू शकतो असं तुम्हाला वाटत?” खरे तर वसीम अक्रमने मागच्या आशिया चषकाची आठवण करून जगाला सांगितले की, “सर्वांनी भारत आणि पाकिस्तान फायनलचे भाकीत केले होते पण शेवटी श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली.” प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “गेल्या वेळी आम्ही म्हणालो होतो की, भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आशिया चषकाची फायनल खेळतील पण नेमकी श्रीलंका फायनलला आली आणि त्यांनी ही स्पर्धा जिंकली.”

हेही वाचा: Javelin Throw: वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी ‘हा’ भालाफेकपटू दोन वर्षे आहे घरापासून दूर; म्हणाला, “कदाचित या वर्षी…”

पुढे तो म्हणाला, “भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ धोकादायक आहेत. जो त्या दिवशी चांगला खेळेल तो संघ जिंकू शकतो. इतर संघही खेळायला आले आहेत, गेल्या वेळी श्रीलंका जिंकला होता. भारत मागच्यावेळी अंतिम फेरीसाठीही पात्र ठरू शकला नव्हता.” वसीम भारत आणि पाकिस्तान सामन्याबद्दल म्हणाला की, “होय, भारत-पाकिस्तान सामना खूप महत्त्वाचा आहे, पण इतर संघही खेळायला आले आहेत. श्रीलंका आणि बांगलादेशकडेही तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.”

आशिया चषकासाठी भारताने संतुलित संघ निवडला- वसीम अक्रम

माजी पाकिस्तानी खेळाडू वसीम म्हणाला, “मला वाटते की भारताने आतापर्यत वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावले आहे, विशेषत: टी२० फॉरमॅटमध्ये ते नवीन खेळाडूंना संधी देत ​​आहे आणि त्याच्याकडे एक नवीन कर्णधारही आहे. आताचा त्यांचा संघ संतुलित आहे पण भारत किंवा इतर कोणत्याही संघासाठी हे काम सोपे नाही.”

हेही वाचा: World Athletics Championships: 4×400 रिलेमध्ये आशियाई विक्रम मोडणाऱ्या भारतीय संघाचे अंतिम फेरीत पदकाने दिली हुलकावणी

यंदाची आशिया चषक स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अतिशय कठीण जाणार असल्याचे पाकिस्तानी दिग्गज खेळाडूच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सर्वांची कामगिरी कशी होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आगामी ५० षटकांच्या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनेही ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे होणार आहे. दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर होणार आहे.