टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. तेव्हा पासून भारतीय संघाचा मर्यादीत षटकांचा भावी कर्णधार कोण असेल यावर चर्चा सुरु झाली आहे. सध्या रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहा हे तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे अनुक्रमे कर्णधार, उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्याचबरोबर या दोघांच्या गैर हजेरीत हार्दिक पांड्याने टी-२० आणि धवनने वनडेत संघाची कमान सांभाळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे, सुनील गावसकर आणि भारताचे रवी शास्त्री यांना वाटते की, पांड्याला नवा टी-२० कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात काहीच गैर नाही. पांड्याने कर्णधारपदाच्या शर्यतीत ऋषभ पंत आणि राहुल यांच्यासारख्यांना मागे टाकले आहे. अशात भारताचा माजी क्रिकेटपटू मनिंदर सिंगने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्यासाठी आणखी एक स्टार निवडला आहे.

बांगलादेश मालिकेसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने आयोजित केलेल्या विशेष मीडिया संवादादरम्यान हिंदुस्तान टाइम्सच्या प्रश्नाला उत्तर देताना, भारताचा माजी क्रिकेटपटू मनिंदरने सुपरस्टार श्रेयस अय्यरला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये कर्णधार रोहितचा आदर्श उत्तराधिकारी म्हणून गौरवले आहे. अय्यर बांगलादेशमध्ये भारताच्या मधल्या फळीताल फलंदाज आहे. त्याचबरोबर स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याला द्विपक्षीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

अष्टपैलू पांड्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये रोहितनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे, असे माजी खेळाडू मनिंदरने निरीक्षण नोंदवले आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना तो म्हणाला, त्याने केकेआरच्या कर्णधाराला खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये एक दीर्घ संधी देण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा – Benz EQB Car launch: कार्यक्रमात एमएस धोनीचा मनाला स्पर्श करणारा सल्ला; म्हणाला, ‘सर्वात आधी तुमची कमाई…’

माजी खेळाडू मनिंदर सिंग म्हणाला, “मी आधीच सांगितले आहे की हार्दिक पांड्याला या क्षणी, तुम्ही पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये कर्णधार बनवू शकता. पण माझ्या मनात अजूनही श्रेयस अय्यर आहे. कारण मी त्याचे ३-४ वर्षे निरीक्षण करत आहे. मला खरोखर आशा आहे की आम्ही त्याला भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये नियमितपणे खेळण्याची संधी दिली पाहिजे. कारण त्याची बुद्धिमत्ता चांगली आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former player maninder singh suggests shreyas iyer not hardik pandya to captain indian team after rohit sharma vbm