Team India World Cup 2023: विश्वचषकासाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना १५ सदस्यीय संघात संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाच्या निवडीवर क्रिकेटच्या दिग्गजांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री, टॉम मूडी आणि हरभजन सिंग यांनीही संघ निवडीबाबत मत मांडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव आणि रवी शास्त्री यांनी या संघाला सक्षम मानले आहे. २०११ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या हरभजन सिंगने युजवेंद्र चहलचे नाव संघात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. निवडकर्त्यांसाठी हा सर्वोत्तम संघ ठरू शकला असता. आता त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता असू शकतो याचा विचार कर्णधाराला करावा लागेल.

कपिल देव म्हणाले, “निवडकर्त्यांसाठी हा सर्वोत्तम संघ ठरू शकला असता. आता त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता असू शकतो याचा विचार कर्णधाराला करावा लागेल.” कपिल देव पुढे म्हणाले की, “संघ जाहीर झाल्यानंतर त्यावर जास्त चर्चा व्हायला नको. संघावर विश्वास असला पाहिजे. तुम्ही कशावरही बोट दाखवू शकता. आता संघ जाहीर झाला असून हा सर्वोत्कृष्ट संघ असल्याचे सर्वांना खात्रीने सांगावे लागेल. सामन्यादरम्यान या गोष्टींवर चर्चा होऊ शकते.”

माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लिहिले, “एक उत्कृष्ट संघ निवडला गेला आहे. चला मित्रांनो, बाहेर पडा आणि काहीतरी साध्य करा आणि आनंद घ्या.

टॉम मूडी म्हणाले, “भारताच्या विश्वचषक संघात आश्चर्य नाही, तुम्ही असा तर्क करू शकता की राखीव फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवच्या आधी तिलक वर्मा अधिक मजबूत खेळाडू असू शकला असता. मधल्या फळीतील डावखुरा जो काही ऑफ स्पिन देऊ शकतो.”

माजी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला, “युजवेंद्र चहल संघात नसल्यामुळे मला आश्चर्य वाटले. चहल मॅचविनर आहे आणि तो संघात असायला हवा होता.”

इरफान पठाण म्हणाला, “आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये निवड झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा, बेधडक व्हा बॉयज.”

रॉबिन उथप्पा म्हणाला, “विश्वचषक संघात आश्चर्य नाही. काही षटके टाकू शकणारा लेफ्टी म्हणून टिळक वर्मा संघात असता तर बरे झाले असते! तरीही या टीमच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा.”

माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने लिहिले, “टीम भारत, टीम इंडिया नाही. या विश्वचषकात आम्ही विराट, रोहित, बुमराह जड्डू यांना चीअर करू. तेव्हा आपल्या हृदयात भारत असावा आणि ज्या जर्सीवर ‘भारत’ लिहिलेले असेल ती जर्सी खेळाडूंनी घालावी.”

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former players reacted after the indian squad was announced for the world cup 2023 vbm