Shahbaz Sharif praises Shaheen Afridi: शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२३ मधील लीग सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची टॉप ऑर्डर फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन आघाडीच्या फलंदाजांना बाद करून संघावर दबाव आणला होता. या सामन्यात त्याने एकूण 4 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीनंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विटरवर भारतीय फलंदाजांची खिल्ली उडवली.

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानने भारतीय फलंदाजांची उडवली खिल्ली –

या सामन्यात शाहीन आफ्रिदीने प्रथम रोहित शर्माला ११ धावांवर बोल्ड केले, तर विराट कोहलीला वैयक्तिक ४ धावांवर बोल्ड करण्यात तो यशस्वी ठरला. या सामन्यात त्याने १० षटकात ३५ धावा देत ४ बळी घेतले आणि २ मेडन षटके टाकली. शाहीन आफ्रिदीने या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना आऊट केले. पाकिस्तानचा माजी पंतप्रधान शाहबाज शरीफने शाहीन आफ्रिदच्या गोलंदाजीबद्दल ट्विट केले आणि लिहिले की, “ते त्याला खेळू शकत नाहीत.” म्हणजेच शाहीन आफ्रिदीची गोलंदाजी भारतीय फलंदाज खेळू शकत नाहीत, असे त्याला म्हणायचे होते.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानविरुद्धच्या भारतीय टॉप ऑर्डरच्या खराब कामगिरीनंतर, इशान किशन आणि हार्दिक पांड्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला २६६ धावा करण्यात यश आले. या सामन्यात किशनने ८१ चेंडूत ८२ धावा केल्या, तर पांड्याने ९० चेंडूत ८७ धावा केल्या. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही झाली. पावसाने या सामन्यात इतका व्यत्यय आणला की नंतर कोणताही निकाल न देता तो रद्द करण्यात आला.

हेही वाचा – IND vs PAK Match Sportsmanship: एका सामन्यात दोन दृश्य; हरिस रौफने केले गैरवर्तन, तर शादाब खानने जिंकली मनं

सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले. अशा प्रकारे पाकिस्तानचे दोन सामन्यांतून तीन गुण झाले. त्यानी पहिल्याच सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. दुसरीकडे, भारताच्या खात्यात एका सामन्यातून एक गुण आहे. आता सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात नेपाळला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. सुपर-४ मध्ये पोहोचणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.

Story img Loader