ICC World Cup 2023: यावर्षी २०२३साली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मर्यादित षटकांचा वर्ल्डकप भारतात होणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होऊ शकते. संघ निवडीपूर्वी क्रिकेटचे अनेक दिग्गज त्यांचा स्वतःचा आवडता १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ निवडत आहेत. सौरव गांगुली, हेडन, संजय मांजरेकर, रवी शास्त्रीसह अनेक क्रिकेटपटूंनी विश्वचषकासाठी त्यांचा आवडता १५ सदस्यीय संघ निवडला आहे. या यादीत माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांचेही नाव जोडले गेले आहे. मात्र, विश्वचषकासाठी संघ निवडल्यानंतर लगेचच एमएसके प्रसाद सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या निशाण्यावर आले.
अश्विन आणि चहलचा संघात समावेश
माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलला आपल्या १५ सदस्यीय संघात समाविष्ट केले आहे. मात्र, शार्दुल ठाकूरला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांना आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात स्थान मिळालेले नाही, त्यामुळे त्यांची विश्वचषकाच्या संघात निवड झाल्याचे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांची ही नाराजी एमएसके प्रसादयांच्यावर आधीपासूनच आहे ही काय पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१९मध्ये विश्वचषक संघात मुख्य निवडकर्ता म्हणून अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरची निवड केल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला होता. विश्वचषकासाठी संघ निवडल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांनी त्याला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
तुमचा थ्रीडी प्लेयर कोण आहे, असे चाहत्यांनी विचारले
माहितीसाठी की, २०१९च्या विश्वचषकात जेव्हा अंबाती रायडूच्या जागी विजय शंकरची निवड करण्यात आली होती, तेव्हा एमएसके प्रसाद 3D खेळाडू संघात असल्याबद्दल बोलले होते. आता विश्वचषकासाठी संघ निवडल्यानंतर चाहत्यांनी त्याला विचारले आहे की, “या संघात त्यांचा 3D खेळाडू कोण आहे? चाहत्यांचे म्हणणे… आशिया चषकातील कामगिरीनंतर निवड समिती निर्णय घेईल, तुम्ही मत दिले नाही तर देशाच्या हिताचे होईल.”
एमएसके प्रसाद यांचा १५ सदस्यीय भारतीय संघ:
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.