BCCI on Ambati Rayudu: भारतीय क्रिकेट संघातून आधीच निवृत्त झालेल्या अंबाती रायुडूने अलीकडेच त्याची आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्ज चॅम्पियन बनल्यानंतर फ्रँचायझी क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर एका मुलाखतीत त्याने २०१९ विश्वचषकासाठी निवड वादावर मोकळेपणाने बोलला. त्याने माजी आणि तत्कालीन निवडकर्ते एम.एसके. प्रसाद यांच्यावर त्याच्याशी परस्पर शत्रुत्व केल्याचा आरोपही केला. त्यानंतर आता माजी निवडकर्ते प्रसाद यांनी रायडूच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. माहितीसाठी! अंबाती रायुडूला २०१९च्या वन डे विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही, त्याच्या जागी विजय शंकरची निवड करण्यात आली होती. यानंतर त्याचे थ्रीडी चष्मा असलेले ट्वीट चांगलेच व्हायरल झाले. त्याचवेळी त्यांनी रागाच्या भरात निवृत्तीची घोषणाही केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवड करायची की निवडायची नाही हा कोणाचाही निर्णय नाही

आयपीएल क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलेल्या रायडूने तत्कालीन निवडकर्ता एम.एसके. प्रसाद यांच्यावर आरोप केले. याला उत्तर देताना प्रसाद म्हणाले की, “राष्ट्रीय संघात निवड प्रक्रियेत परस्पर वादाला किंवा पक्षपातीपणाला स्थान नाही. टीम इंडियात जर पक्षपात झाला आहे तर त्याची तुम्ही चौकशी करू शकतात, माझी काहीही हरकत नाही. कोणत्याही एका निवडकर्त्याच्या बोलण्याने तिथे काहीही होत नाही. त्यात कर्णधारासह अन्य पाच जण होते. कोणाची निवड करायची की नाही हा सर्वानुमते निर्णय असतो.”

हेही वाचा: World Cup 2023: पीसीबीचं नवीन नाटक; पाकिस्तानचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही? म्हणाले, “सरकारने आयसीसीसमोर…”

प्रसाद यांनी २०१९मध्ये झालेल्या निवड बैठकीचा जरी तपशील सांगितला नसला तरी, क्रिकबझशी बोलताना ते म्हणाले की, “इतर समिती सदस्य देवांग गांधी, गगन खोडा, सरनदीप सिंग आणि जतीन परांजपे यांच्यासोबत कर्णधार विराट कोहलीही होता. हे सर्व त्यावेळी संघ निवडीच्या मीटिंगचा एक भाग होते. तिथे इतर पाच जणांचेही काही मत होते, त्यामुळे टीम इंडियामध्ये पक्षपात होणे शक्य नाही.”

रायुडू आणि प्रसाद यांच्यात नेमका काय वाद आहे?

२००५-०६ मध्ये जेव्हा अंबाती रायुडू हैदराबादकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळत असे तेव्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल यादव यांच्याशी त्यांचा काही वाद झाला. त्यामुळे रायुडू आंध्र प्रदेशकडून खेळू लागला. त्यावेळी त्याला एम.एसके. प्रसादच्या नेतृत्वाखाली आंध्र संघात खेळावे लागले. नंतर दोघांमध्ये काही वाद झाला असावा. ज्याबाबत रायुडूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “मी असे म्हणत नाही की त्याच्यामुळे माझी निवड झाली नाही पण मला त्याची काम करण्याची शैली आवडत नाही. त्यामुळेच मी आंध्र सोडून पुन्हा हैदराबादला परतलो.”

हेही वाचा: IND vs WI: रोहित-हार्दिकला वेस्ट इंडीज दौऱ्यावर मिळणार विश्रांती? ‘हा’ खेळाडू असणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन, जाणून घ्या

अंबाती रायुडूची कारकीर्द कशी होती?

अंबाती रायडूने २०१३ मध्ये भारताकडून एकदिवसीय आणि २०१४ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याने टीम इंडियासाठी ५५ वन डे खेळताना ३ शतके आणि १० अर्धशतकांसह १६९४ धावा केल्या. त्याशिवाय तो ६ टी२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळला ज्यामध्ये तो काही विशेष करू शकला नाही. एकदिवसीय सामन्यातही त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत. तो नंतर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. या अष्टपैलू खेळाडूने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि जवळपास १४ हंगाम खेळले, २०३ सामन्यांमध्ये ४३४८ धावा केल्या. रायुडूचे आयपीएलमध्ये एक शतक आणि २२ अर्धशतके आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former selectors m sk prasad reply on ambati rayudus allegations said there is no favoritism in team india avw
Show comments