आयसीसी महिला विश्वचषकात महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाने पहिल्या दोन सामन्यांत तुफान फटकेबाजी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. यावेळी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्मृतीने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा आपला आवडता खेळाडू असल्याचं मान्य केलं होतं.
याविषयी कुमार संगकारा याला विचारलं असता संगकाराने, स्मृतीचे आभार मानले आहेत. “माझं नाव घेतल्याबद्दल स्मृतीचा मी आभारी आहे. स्मृती खूप चांगली खेळाडू आहे. विश्वचषकात त्याने केलेला खेळ हा खरच वाखणण्याजोगा आहे”, असं म्हणत संगकाराने स्मृतीच्या खेळाचं कौतुक केलं आहे.
पहिल्या दोन सामन्यांचा अपवाद वगळता स्मृती मंधानाला विश्वचषकात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात तिचा मोठा वाटा होता. आपला खेळ सुधारण्यामध्ये सौरव गांगुली आणि कुमार संगकारा या दोन खेळाडूंचा मोठा वाटा असल्याचं स्मृतीने याआधी अनेकदा कबुल केलंय. जेव्हा कधीही माझा खेळ अपेक्षेप्रमाणे होत नसेल, त्यावेळी मी कुमार संगकाराच्या फलंदाजीचे व्हिडीओ बघते. त्याच्या फलंदाजीची शैली मला खूप आवडते असं म्हणतं संगकारा हा आपलं प्रेरणास्थान असल्याचं स्मृतीने कबुल केलं होतं.
अवश्य वाचा – हेडनची आक्रमकता, संगकाराची तंत्रशुद्ध फलंदाजी भावते