भारतीय क्रिकेट संघाचे माजी मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांनी त्यांच्या ‘द बेअरफूट कोच’ या पुस्तकात एक मोठा खुलासा केला आहे. अप्टन यांनी पुस्तकात लिहिले आहे, की त्यांनी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना शारीरिक संबंध म्हणजेच सेक्स करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यामुळे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टनही नाराज झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅडी अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात ही माहिती दिली आहे. त्यादरम्यान त्यांनी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर यांसारख्या खेळाडूंना यासंबंधी संपूर्ण माहिती दिल्याचे सांगितले. २००९च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या वेळीही त्यांनी खेळाडूंना हा सल्ला दिला होता. खेळाडूंना दिलेल्या या सल्ल्याबद्दल अप्टन यांना माफी मागावी लागली. त्यानंतर त्यांनी भारतीय खेळाडूंना असा सल्ला देणे, आपली चूक असल्याचे मान्य केले.

हेही वाचा – VIRAL VIDEO : राडाच ना..! रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटनं लगावले होते ‘ठुमके’; सोनाक्षी सिन्हासोबत…

पॅडी अप्टन यांची २००९ मध्ये टीम इंडियाच्या मेंटल कंडिशनिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०११ पर्यंत ते भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तेव्हाही ते सपोर्ट स्टाफचा भाग होते. मात्र, करार संपल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले नाही. याशिवाय ते आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे सहाय्यक प्रशिक्षकही राहिले आहेत.

एखाद्या क्रीडा स्पर्धेपूर्वी सेक्स करणे फायद्याचे..!

मेक्सिको विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे सामान्य समन्वयक जुआन कार्लोस मेडिना यांचेही मत आहे, की क्रीडा स्पर्धेपूर्वी शारीरिक संबंध ठेवल्याने खेळाडूंना फायदा होतो. त्यामुळे खेळाडू मानसिकदृष्ट्या आरामशीर, समाधानी आणि आनंदी राहतात. यामुळे त्याच्या मनातील तणाव पूर्णपणे संपतो. त्याच वेळी, मेक्सिकोच्या नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीच्या (UNAM) स्पोर्ट्स मेडिसिनच्या संचालक मारिया क्रिस्टिना रॉड्रिग्ज यांचे मत आहे, की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर कोणत्याही खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होत नाही. उलट त्यामुळे खेळाडूंना मदत होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former team india coach paddy upton advise in his book team india for sex before match adn