प्रो-कबड्डीत तेलगू टायटन्स संघाकडून खेळणाऱ्या एस. महालिंगम या खेळाडूचं अपघाती निधन झालं आहे. ९ सप्टेंबररोजी झालेल्या एका अपघातात महालिंगमला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तेलगू टायटन्सकडून महालिंगम डाव्या कोपऱ्यावर खेळायचा. भक्कम बचाव आणि आक्रमक चढायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महालिंगमने अनेक सामन्यांमध्ये तेलगू टायटन्सला विजय मिळवून दिला आहे. चौथ्या पर्वात चांगली कामगिरी करुनही महालिंगमवर पाचव्या पर्वात कोणतीही बोली लावण्यात आली नव्हती. सहाव्या पर्वात महालिंगमचं नाव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं नव्हतं.

Story img Loader