Yuvraj Singh On Chris Gayle Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ख्रिस गेल पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या प्रसिद्ध ‘सीयू’ सेलिब्रेशनची कॉपी करताना दिसत आहे. ख्रिस गेलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचवेळी भारताचा माजी स्टार युवराज सिंगने ख्रिस गेलच्या पोस्टवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर युवराज सिंगने ख्रिस गेलच्या पोस्टवर हसणारी इमोजी कमेंट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

मात्र, ख्रिस गेलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून मजेदार व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो सतत वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतो. वास्तविक, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल २०२३च्या सीझनमधून बाहेर होता, तेव्हा युनिव्हर्स बॉसने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ख्रिस गेलने मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटाच्या ऑडिओवर मजेशीर अभिनय केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. चाहत्यांनी त्याच्या आवडत्या स्टारचा व्हिडिओ लाइक आणि शेअरही केला होता. यावेळच्या ‘सीयू’ सेलिब्रेशन कॉपीचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहे.

ख्रिस गेल आयपीएलमध्ये या संघांकडून खेळला होता

विशेष म्हणजे ख्रिस गेल बराच काळ आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. याशिवाय तो कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जकडूनही खेळला आहे. वास्तविक, ख्रिस गेलने त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात कोलकाता नाइट रायडर्समधून केली होती, परंतु आयपीएल २०११ मध्ये युनिव्हर्स बॉसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये प्रवेश केला होता. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल २०११ ते आयपीएल २०१७ पर्यंत खेळला. यानंतर ख्रिस गेलने पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केले.

हिटमॅन रोहित शर्मा लवकरच ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम टाकणार मागे

भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धचा महिनाभराचा दौरा सुरू करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. यानंतर टीम इंडियाला येथे ३ वन डे आणि पाच टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आगामी दौऱ्यावर एक मोठा विक्रम करू शकतो.

हेही वाचा: Yashasvi Jaiswal: “एक दिवस भारतासाठी…”, कधी काळी झाडावर चढून सामना पाहणारा कसोटी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी!

खरं तर, रोहित शर्माने आतापर्यंत ४४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि ४६१ डावांमध्ये एकूण ५२७ षटकार मारले आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर ख्रिस गेल आहे ज्याने ४८३ सामन्यांच्या ५५१ डावांमध्ये ५५३ षटकार ठोकले आहेत. म्हणजेच रोहित शर्माने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर २७ षटकार मारले तर तो विश्वविक्रम करून जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार ठोकणारा खेळाडू होऊ शकतो. रोहित शर्माने हे सर्व सामने खेळले तर कदाचित हा विक्रम त्याच्या नावावर होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former west indies player chris gayle copied ronaldo siuu celebration yuvraj singhs reaction video viral avw