यावेळच्या इंडियन ग्रां.प्रि.मध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार नसला तरी, सहारा फोर्स इंडियाने सचिनच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठीची तयारी केली आहे.
सहारा फोर्स तर्फे इंडियन ग्रां.प्रि.स्पर्धेच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रत्येक अपडेटला सचिनला क्रिकेटविश्वात संबोधल्या जाणाऱया ‘मास्टरब्लास्टर’ या नावाचा हॅशटॅग देण्यात येणार आहे. सहारा फोर्सने म्हटले की, सचिनसारखी यशस्वी उंची गाठण्याचे सहारा फोर्सचेही लक्ष्य आहे. सचिन क्रिकेटविश्वातून निवृत्ती घेत असल्याने सर्वांना त्याचे दुख आहेच. यावेळी सहारा फोर्सच्या प्रत्येक ट्विटमध्ये मास्टरब्लास्टर (#masterblaster) हा हॅशटॅग वापरण्यात येणार आहे. याबरोबरच संघ यावेळीच्या ग्रां.प्रि.मध्ये चांगली कामगिरी करेल असेही म्हटले आहे.

Story img Loader