आयपीएल २०२१ स्पर्धा संपल्यानंतर लगेचच टी २० वर्ल्डकप सुरु होणार आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात चार फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यात जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, राहुल चाहर, अक्षर पटेल, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती, हार्दीक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांची निवड केली आहे. जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती हे चार गोलंदाज आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत. मात्र फिरकीपटू आर. अश्विनच्या गोलंदाजीची छाप पडताना दिसत नाही.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने १३ सामन्यात १९ गडी बाद केले आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. बुमराने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाबची कामगिरी हवी तशी झाली नाही. मात्र पंजाबकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीने १३ सामन्यात १८ गडी बाद केले आहेत. विशेष म्हणजे मोहम्मद शमी प्रत्येक १६ व्या चेंडूवर गडी बाद करत असल्याचं दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएलमध्ये टॉप २ संघात आहे. दिल्लीच्या विजयात अक्षर पटेलची महत्वपूर्ण भूमिका आहे. अक्षर पटेलनं ९ सामन्यात १४ गडी बाद केले आहेत. तर वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी चांगली होत आहे. त्याने आतापर्यंत १५ गडी बाद केले आहेत. युएईच्या खेळपट्टीवर खेळताना एकूण २८ आयपीएल स्पर्धेत एकूण ३२ गडी बाद केले आहे. मात्र चार गोलंदाज फॉर्मात असताना आर. अश्विनच्या गोलंदाजी हवी तशी होताना दिसत नाही. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पाच सामन्यात त्याने फक्त चार गडी बाद केले आहेत. त्यामुळे वर्ल्डकप प्लेईंग ११ चा विचार केल्यास त्याला संघाबाहेर बसावं लागेल असं दिसतंय.

दुसरीकडे रवींद्र जडेजाची संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली असल्याने पाचव्या गोलंदाजाची जागा भरून निघणार आहे. जडेजाने १३ सामन्यात १० गडी बाद केले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियातील राहुल चाहर आणि भुवनेश्वर कुमार फॉर्म गवसताना दिसत नाही. चाहरने दुसऱ्या टप्प्यातील चार सामन्यात फक्त दोन गडी बाद केले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याला बाहेर बसवलं होतं. तर भुवनेश्वर कुमारने १० सामन्यात फक्त ५ गडी बादे केले आहेत.

भारतीय संघ
फलंदाज- विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
अष्टपैलू खेळाडू- हार्दीक पांड्या, रवींद्र जडेजा
फिरकीपटू- राहुल चाहर, अक्षर पटेल, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती
यष्टीरक्षक- केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन
राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर

Story img Loader