ICC T20 Cricketer of the Year 2023 : जून २०२४ मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संयोजनावर सातत्याने चर्चा होत आहे. संघाचा सर्वात मोठा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या दुखापतीने त्रस्त आहे. दक्षिण आफ्रिकेत दुखापत झाल्यानंतर, चाहत्यांना आशा आहे की स्काय लवकरात लवकर तंदुरुस्त होईल, दरम्यान त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. वास्तविक, सूर्याला आयसीसीकडून वर्ष २०२३ च्या टी-२० क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवला सलग दुसऱ्यांदा आयसीसीने विशेष सन्मानासाठी नामांकन दिले आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही यादी जाहीर केली आहे. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त या यादीत इतर तीन देशांच्या खेळाडूंचाही समावेश आहे. ज्यापैकी एकाला टी-२० क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार दिला जाणार आहे.

कोण आहेत ते चार खेळाडू?

आयसीसीने या वेळी पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी नामांकन केलेले खेळाडू. त्यात भारताचा झंझावाती फलंदाज सूर्यकुमार यादवच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत सूर्याशिवाय झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाचे नाव आहे. युगांडाचा उदयोन्मुख स्टार अल्पेश रामजानी याच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. या यादीत न्यूझीलंडचा फलंदाज मार्क चॅपमननेही आपले स्थान निर्माण केले आहे. आयसीसीने नामनिर्देशित केलेल्या या चार खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हेही वाचा – IND vs SA 2nd Test : विराट कोहलीच्या गुरुमंत्राने मोहम्मद सिराजला मिळाली मार्को यान्सनची विकेट, VIDEO होतोय व्हायरल

२०२३ मध्ये सूर्याची बॅट जबरदस्त तळपली –

२०२३ हे वर्ष सूर्यकुमार यादवसाठी खूप चांगले वर्ष होते. त्याची बॅट यंदा टी-२० फॉरमॅटमध्ये चांगली चालली. सूर्यकुमार यादवने २०२३ साली टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १७ डाव खेळले होते. या कालावधीत त्याने ४८.८६ च्या सरासरीने ७३३ धावा केल्या. त्‍याने यावर्षी टी-२० मध्‍ये दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. सूर्याची कामगिरी पाहता तो सलग दुसऱ्या वर्षी आयसीसी पुरुष टी-२० क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब पटकावेल अशी चाहत्यांना पूर्ण आशा आहे.