फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेच्या एकेरीच्या मुख्य फेरीत यंदा कोणताही भारतीय खेळाडू खेळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पात्रता स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत युकी भांब्रीसह तिन्ही खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. जर्मनीच्या टिम पुएत्झने युकीचा ६-४, ६-३ असा पराभव केला, तर अमेरिकेच्या जेरेड डोनाल्डसनने रामकुमार रामनाथनला ६-२, ६-० असे पराभूत केले. याचप्रमाणे रशियाच्या एव्हगेनी डॉनस्कॉयने सोमदेव देववर्मनला ६-२, ६-४ अशा फरकाने हरवले. यंदाच्या हंगामातील दुसऱ्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पध्रेत भारताच्या आव्हानाची धुरा सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णावर असणार आहे. जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली सानिया महिला दुहेरी प्रकारात तर बोपण्णा पुरुष दुहेरीत खेळणार आहे.

Story img Loader