पीटीआय, पॅरिस

भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्याच वेळी पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला.दुखापतीतून सावरल्यानंतर आपल्या पहिल्याच स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या सिंधूने जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या बिवेन झँगला १३-२१, २१-१०, २१-१४ असे पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली. पुरुष एकेरीत श्रीकांतला लू गुआंग झू याच्याकडून २१-१९, १२-२१, २०-२२ अशा पराभवाचा सामना करावा लागला.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
Pakistan Surpassed India And Holds Record of Most ODI Wins by Asian Team in Australia After AUS vs PAK match
पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही. झँगने पहिल्या गेममध्ये १४-९ अशी आघाडी घेतली. हीच लय कायम राखत तिने गेम आठ गुणांनी जिंकला. दुसऱ्या गेममध्येही झँगने ३-० अशी आघाडी घेतली. मात्र, यानंतर सिंधूने खेळ उंचावत सलग गुणांची कमाई केली. गेमच्या मध्यंतरापर्यंत सिंधूने ११-७ अशी आघाडी मिळवली होती. तिने पुढेही चांगला खेळ सुरू ठेवत हा गेम ११ गुणांच्या फरकाने जिंकला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सिंधूकडे पुन्हा ११-७ अशी आघाडी होती. तिने ती १७-१३ अशी वाढवली. मग, तिने पाचपैकी चार गुणांची कमाई करताना गेमसह सामना जिंकला.

हेही वाचा >>>IND vs ENG : भारताच्या फिरकीसमोर इंग्लंड हतबल, रोहित-यशस्वीने झळकावले अर्धशतक, पहिल्या दिवशी यजमानांचे वर्चस्व

दुसरीकडे, श्रीकांतने गुआंग झूविरुद्ध चांगली सुरुवात केली. त्याला पहिला गेम जिंकण्यातही यश आले. मात्र, त्यानंतर त्याचा खेळ खालावला आणि त्याने पुढील दोनही गेम गमावले.ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीतील जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. भारतीय जोडीने जपानच्या युकी फुकुशिमा व सयाका हिरोता या सातव्या मानांकित जोडीला २१-१८, २१-१३ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.