पीटीआय, पॅरिस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्याच वेळी पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला.दुखापतीतून सावरल्यानंतर आपल्या पहिल्याच स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या सिंधूने जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या बिवेन झँगला १३-२१, २१-१०, २१-१४ असे पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली. पुरुष एकेरीत श्रीकांतला लू गुआंग झू याच्याकडून २१-१९, १२-२१, २०-२२ अशा पराभवाचा सामना करावा लागला.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही. झँगने पहिल्या गेममध्ये १४-९ अशी आघाडी घेतली. हीच लय कायम राखत तिने गेम आठ गुणांनी जिंकला. दुसऱ्या गेममध्येही झँगने ३-० अशी आघाडी घेतली. मात्र, यानंतर सिंधूने खेळ उंचावत सलग गुणांची कमाई केली. गेमच्या मध्यंतरापर्यंत सिंधूने ११-७ अशी आघाडी मिळवली होती. तिने पुढेही चांगला खेळ सुरू ठेवत हा गेम ११ गुणांच्या फरकाने जिंकला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सिंधूकडे पुन्हा ११-७ अशी आघाडी होती. तिने ती १७-१३ अशी वाढवली. मग, तिने पाचपैकी चार गुणांची कमाई करताना गेमसह सामना जिंकला.
हेही वाचा >>>IND vs ENG : भारताच्या फिरकीसमोर इंग्लंड हतबल, रोहित-यशस्वीने झळकावले अर्धशतक, पहिल्या दिवशी यजमानांचे वर्चस्व
दुसरीकडे, श्रीकांतने गुआंग झूविरुद्ध चांगली सुरुवात केली. त्याला पहिला गेम जिंकण्यातही यश आले. मात्र, त्यानंतर त्याचा खेळ खालावला आणि त्याने पुढील दोनही गेम गमावले.ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीतील जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. भारतीय जोडीने जपानच्या युकी फुकुशिमा व सयाका हिरोता या सातव्या मानांकित जोडीला २१-१८, २१-१३ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.