पॅरिस : भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने बॅडिमटनच्या पुरुष दुहेरीतील आपली मक्तेदारी कायम राखत फ्रेंच खुल्या बॅडिमटन स्पर्धेचे (सुपर ७५० दर्जा) विजेतेपद मिळवले. अंतिम लढतीत रविवारी सात्त्विक-चिरागने चायनीज तैपेइच्या हे हुएई ली-पो सुआन यांग जोडीचे आव्हान अवघ्या ३७ मिनिटांत २१-११, २१-१७ असे सहज परतवून लावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यंदाच्या हंगामात सात्त्विक-चिरागने सलग तिसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, आधीच्या दोन स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या वेळी त्यांनी हे अपयश पुसून काढले. फ्रेंच स्पर्धेतील भारतीय जोडीचे हे दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी २०२२ मध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती.

हेही वाचा >>> WPL 2024 : रिचा घोषची कडवी झुंज अखेर अपयशी, थरारक सामन्यात दिल्लीचा आरसीबीवर १ धावेने विजय

अंतिम लढतीत सात्त्विक-चिराग यांनी अपेक्षित वर्चस्व राखले होते. लढतीमधील अखेरच्या १० गुणांपैकी ८ गुण भारतीय जोडीने पटकावून चायनीज तैपेइच्या प्रतिस्पर्धी जोडीस निष्प्रभ केले. पहिल्या गेमला दोन्ही जोडयांनी सावध सुरुवात केली होती. मात्र ४-४ अशी बरोबरीवर सलग पाच गुण मिळतवत सात्त्विक-चिरागने ९-४ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर मागे वळून बघितलेच नाही. गेमच्या मध्याला भारतीय जोडी ११-६ अशी आघाडीवर होती. ही आघाडी सातत्याने वाढवत नेत भारतीय जोडीने पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये काहीशी चढाओढ दिसली. पण, चायनीज तैपेइची ली आणि यांग जोडी भारताच्या सात्त्विक-चिराग जोडीच्या आव्हानाचा सामना करू शकली नाही. सात्त्विक-चिरागने १४-१४ अशा बरोबरीनंतर सातत्याने गुणांची कमाई करताना प्रतिस्पर्धी जोडीला पुढे केवळ तीनच गुण देत विजयावर शिक्कामोर्तब केले.