French Open Tennis Tournament पॅरिस : महिलांमध्ये तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुला आणि पुरुषांमध्ये सातव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्ह यांना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का आणि सहाव्या मानांकित कोको गॉफने, तर पुरुषांमध्ये नवव्या मानांकित टेलर फ्रिट्झ आणि २२व्या मानंकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी मात्र विजयी घोडदौड कायम राखली.

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पेगुला २८व्या मानांकित बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सकडून पराभूत झाली. मर्टेन्सने ही लढत ६-१, ६-३ अशी सहज जिंकली. पेगुलाने गेल्या पाचपैकी चार ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठला आहे. मात्र, फ्रेंच स्पर्धेत तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पेगुलाची अमेरिकन सहकारी गॉफला मात्र विजय मिळवण्यात यश आले. गॉफने ऑस्ट्रियाच्या जुलिया ग्राबहेरचा ६-२, ६-३ असा पराभव केला. तसेच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार सबालेन्काने बिगरमानांकित कॅमिला राखिमोव्हाला ६-२, ६-२ असे नमवले.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रुब्लेव्हला संघर्षपूर्ण लढतीअंती पराभवाचा सामना करावा लागला. इटलीच्या लोरेन्झो सोनेगोने दोन गेमची पिछाडी भरुन काढताना रुब्लेव्हवर ५-७, ०-६, ६-३, ७-६ (७-५), ६-३ अशी मात केली. रुब्लेव्हला यंदा जेतेपदाची संधी होती, पण त्याने निराशा केली. फ्रिट्झने चांगली कामगिरी करताना फ्रान्सच्या आर्थर रिन्डेरनेकला २-६, ६-४, ६-३, ६-४ असे पराभूत केले. तसेच जर्मनीच्या झ्वेरेव्हने अॅलेक्स मोकॅनला ६-४, ६-२, ६-१ असे नमवत तिसरी फेरी गाठली.
(आंद्रे रुब्लेव्ह)