अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोव्हा.. टेनिसजगतामधील या दोन दिग्गज रणरागिणी.. आपल्या झंझावाती खेळामुळे प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवणारी सेरेना गेली काही वष्रे दुखापतींवर मात करून खंबीरपणे उभी आहे.. तर निखळ सौंदर्य आणि शानदार खेळ यामुळे शारापोव्हाची वाटचाल एखाद्या टेनिससम्राज्ञीप्रमाणे सुरू आहे.. लाल मातीवर आपली सत्ता आणण्यासाठी शनिवारी सेरेना आणि शारापोव्हा एकमेकांसमोर उभ्या ठाकतील.. जागतिक क्रमवारीकडे दृष्टीक्षेप टाकल्यास सेरेना अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर शारापोव्हा दुसऱ्या स्थानावर आहे.. फ्रेंच खुल्या स्पर्धेतही सेरेनाला अव्वल तर शारापोव्हाला दुसरे मानांकन देण्यात आलेले आहे.. टेनिसमध्ये दिसणारी हीच स्पर्धा शनिवारी टेनिसरसिकांना अनुभवता येईल.
१५ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या सेरेनाला गेल्या वर्षी याच स्पर्धेत सलामीच्या सामन्यातच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या कटू स्मृती मागे टाकून जेतेपद पटकावण्यासाठी सेरेना यंदा सज्ज झाली आहे. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात तिने केवळ एकमेव सेट गमावला आहे. दुसरीकडे जेतेपद राखण्याचे मोठे आव्हान शारापोव्हावर असेल. गेल्या वर्षी सारा इरानीवर मात करत शारापोव्हाने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह कारकीर्दीतील ग्रँड स्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण केले होते. हे जेतेपद चमत्कार नाही, हे सिद्ध करण्याची शारापोव्हाला चांगली संधी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा