भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंह, आपल्या नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. गेली अनेक वर्ष हरभजनला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही, मात्र आयपीएलमध्ये तो चेन्नईकडून खेळतो आहे. अशातच हरभजन सिंहने चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. हरभजन ‘फ्रेंडशिप’ या तामिळ सिनेमात प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत असणार आहे. खुद्द हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.
நேற்று கீச்சு,சினிமா கதாபாத்திரம்,இணைய தொடர்.இன்று #SeantoaStudio #CinemaaStudio தயாரிக்கும் #FriendShip படத்தின் நாயகன்.#தமிழ் மக்களுக்கு நன்றி.திருக்குறள் டூ திரைப்பயணம் எல்லாம் சாத்தியப்படுத்தியது என் #தலைவர் #தல #தளபதி சின்னாளப்பட்டி சரவணன்-@ImSaravanan_P அசத்துவோம் @JPRJOHN1 pic.twitter.com/Z5pePt7R72
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 2, 2020
जॉन पॉल राज आणि शाम सूर्या यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पोस्टर पाहिल्यानंतर, चित्रपटाची कथा ही दंगलीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं दिसून येतं. तामिळ सोबत आणखी ४ भाषांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी हरभजन सिंहने टिव्हीवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये आपली हजेरी लावली आहे. त्यामुळे हरभजनचे चाहते त्याला या नवीन भूमिकेत स्विकारतात का हे पहावं लागणार आहे.