Sachin Tendulkar gets emotional while wishing daughter Sara on her birthday : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आपल्या मुलीबद्दल खूप भावूक आहे. जेव्हा तो आपल्या मुलीसाठी पोस्ट करतो तेव्हा त्याच्या भावना स्पष्टपणे दिसून येतात. शनिवारी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सचिनने सारासोबतचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आणि हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिले. साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकरनेही आपल्या बहिणीसाठी पोस्ट केली होती. सारा तेंडुलकर आज आपल्या २७वा वाढदिवस साजरा करत आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन तेंडुलकरची सारासाठी भावनिक पोस्ट –

सचिनने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत एक अतिशय लहान सारा त्याच्या मांडीवर बसलेली आहे. दुसऱ्या फोटोत तो सारासोबत सोफ्यावर बसला आहे. साराचा पाळीव कुत्राही या फोटो आहे. सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘छोट्या आश्चर्यापासून ते एका अद्भुत स्त्रीपर्यंत, मला तू मी किती भाग्यवान आहे, याची जाणीव करून दिली आहेस. कारण तू माझ्या आयुष्यात आहे. तुझ्यामुळे माझे हृदय प्रेमाने भरले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सारा.

सचिन तेंडुलकरच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस –

सचिनने पोस्ट शेअर करताच अवघ्या एका तासात अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. वडील आणि मुलीचे हे प्रेम चाहत्यांना खूप आवडले. चाहत्यांनीही कमेंट्समध्ये साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केवळ सचिनच नाही तर अर्जुन तेंडुलकरनेही साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तो आणि सारा एकत्र दिसत आहेत. त्यांनी स्टोरीवर लिहिले, ‘हॅपी बर्थडे सारा.’

हेही वाचा – विराट-रोहितचा काळ गेला, आता ‘हा’ खेळाडू भारताचा सर्वोत्तम खेळाडू; Border Gavaskar Trophy पूर्वी संजय मांजरेकरांचं वक्तव्य

अलीकडेच साराने इन्स्टाग्रामवर ‘गर्ल चाइल्ड डे’ संदर्भात एक पोस्ट केली होती. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त साराने सचिन तेंडुलकर फाउंडेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. कॅप्शनमध्ये साराने तिच्या वडिलांच्या फाउंडेशनबद्दल लिहिले होते जे गरजू मुलींना मदत करते. तिने लिहिले होते की, ‘या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आम्ही मुलींच्या हक्कांसाठी काम करतो. अनेक मुलींना अजूनही अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांच्या संधी मर्यादित होतात. त्यांच्या क्षमतांना बाधा येते. सचिन तेंडुलकर फाउंडेशनमध्ये आम्ही त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी काम करतो.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From a tiny wonder to a wonderful woman sachin tendulkar share emotional birthday post for daughter sara vbm