भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने इतिहास घडवला आणि १०० वर्षांचा ट्रॅक आणि फिल्ड गेम्समधील भारताचा दुष्काळ संपला. १३ वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं. या यशानंतर नीरजवर सर्वच स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आज नीरजबरोबरच भारतीय महिला हॉकी संघही भारतामध्ये परतणार आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास हे खेळाडू मायदेशी परतणार आहेत. विशेष म्हणजे नीरजच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जंगी तयारी केली असून घरीसुद्धा खास तयारी करण्यात आलीय.
नक्की वाचा >> आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?
हरयाणामधील पानिपत येथील खांदरा गावामधील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या नीरजने शनिवारी ऑलिम्पिकमधील भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर नीरजच्या गावात दिवाळीच साजरी झाली. गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. गावकऱ्यांना कधी एकदा आपण नीरजला पाहतोय असं झालं. नीरजच्या स्वागतासाठी गावात विशेष तयारी करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> ४ लाख ३५ हजारांचे ४ भाले अन् एकूण खर्च… नीरजच्या प्रशिक्षणासाठी मोदी सरकारने किती खर्च केला माहितीये?
नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”
नीरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ साली झाला असून. त्याचे वडील सतीश कुमार हे शेतकरी तर आई सरोज देवी या गृहिणी आहेत. २०१६ साली इंटरनॅशनल अमॅच्यूअर अॅथलेटीक फेड्रेशन म्हणजेच आयएएफने आयोजित केलेल्या स्पर्धेत नीरजने जागतिक विक्रम केला तेव्हा तो पहिल्यांचा प्रकाशझोतात आलं. त्याने पहिल्या प्रयत्नात केलेल्या ८६.४८ मीटरच्या प्रयत्नामध्ये त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये २०१६ सालीच कांस्यपदक मिळालं असतं. मात्र जेव्हा ही तरुण खेळाडूंची स्पर्धा झाली तेव्हा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवण्याचा कालावधी उलटून गेल्याने नीरजला पाच वर्षे वाट पहावी लागली. मात्र पाच वर्षानंतर त्याने आपल्या पालकांचं आणि गावाचेच नाही तर संपूर्ण जगात देशाचं नावही उज्वल करणारी कामगिरी केलीय.
नक्की वाचा >> टोक्योला जाण्यापूर्वीच बहिणीचा मृत्यू, आईने लपवून ठेवली बातमी; मायदेशी परतल्यानंतर ‘ती’ विमानतळावरच ढसाढसा रडली
पदक जिंकून आल्यानंतर तुझं थाटात स्वागत करणार असा शब्द नीरजच्या आईने त्याला दिला होता. नीरजने आजचं यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. अगदी त्याला आवडणाऱ्या पदार्थांपासून ते त्याच्या वयातील इतर मुलांप्रमाणे सामान्य आयुष्य जगण्याऐवजी त्याने प्रशिक्षणासाठी वेळ देण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळेच आता पुन्हा मैदानात जाण्याआधी या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी त्याचं संपूर्ण गाव खांदरा गाव तयार झालं आहे. नीरजच्या घराला आझ विशेष रोषणाई करण्यात येणार आहे.
नक्की वाचा >> ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज मराठ्यांचा वंशज; पूर्वज लढले होते पानिपतच्या युद्धात
नक्की पाहा >> जन गण मन… १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये वाजलं भारताचं राष्ट्रगीत; Video पाहताच अंगावर काटा येईल
नीरजच्या स्वागतासाठी काय तयारी करण्यात आलीय यासंदर्भात त्याची आई सरोज देवी यांनी इंडिया टुडेशी बोलताना माहिती दिलीय. डीजेची व्यवस्था करण्यात आली असून घराची सजावटही करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या आवडीचा चुरमा हा पदार्थही मी बनवणार असल्याचं सरोज देवी म्हणाल्या आहेत. “आमच्यासाठी हा फार आनंदाचा दिवस आहे. त्याला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. मी त्याला चुरमा खाऊ घालणार आहे. डीजे बोलवणार असून आम्ही सर्व घराची सजावट करणार आहोत,” असं तयारीसंदर्भात बोलताना सरोज देवी यांनी सांगितलं आहे.