भारतीय संघ शुक्रवारपासून (१८ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील पराभव विसरून नव्याने सुरुवात करेल. या मालिकेतील पहिला सामना आज वेलिंग्टन येथे खेळणार आहे . या सामन्याला दुपारी १२:३० सुरुवात होणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडू या मालिकेत दिसणार नाहीत. अशा स्थितीत कर्णधार हार्दिकसह अनेक युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.

हार्दिक पांड्या: टी-२० विश्वचषक हा हार्दिकसाठी संमिश्र होता. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ४० धावा करण्यासोबतच त्याने तीन विकेट्सही घेतल्या होत्या. त्यानंतर उपांत्य फेरीत त्याची बॅट सरळ चालली. हार्दिकने ६३ धावा केल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या मालिकेतही हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. याआधी आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला २-द ने विजय मिळवून दिला होता. हार्दिक प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संघाविरुद्ध कर्णधारपद भूषवणार आहे. भविष्यात त्याला संघाचा टी-२० कर्णधार बनवले जाऊ शकते. त्याआधी हार्दिकची मोठी परीक्षा आहे. त्याला फलंदाजी-गोलंदाजीसोबतच कर्णधारपदातही प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे.

Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
Rohit Sharma and Virat Kohli included in India squad for Champions Trophy ODIs
रोहित, विराटच्या समावेशाची शक्यता; चॅम्पियन्स करंडकासाठी राहुल, शमी, जडेजाबाबत संदिग्धता
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
IND vs AUS Rohit Sharma name missing from official list of Indian squad for Sydney Test goes viral
IND vs AUS : विश्रांती सोडा, रोहित शर्मा स्क्वॉडमध्येच नाही? गौतम गंभीरच्या सहीनिशी यादीचा फोटो व्हायरल!
IND vs AUS 5th Test Predicted Playing 11 Full Squad Players List Match Timing Live Telecast
IND vs AUS: रोहित शर्माच्या विश्रांतीच्या निर्णयानंतर प्लेइंग इलेव्हन कशी असणार? सिडनी कसोटी किती वाजता सुरू होणार?
Kusal Parera T20I Century for Sri Lanka After 13 Years and Broke Tillakaratne Dilshan Record of Fastest Century NZ vs SL
NZ vs SL: ४४ चेंडूत शतक ! श्रीलंकेकडून टी-२०मध्ये १३ वर्षांत पहिल्यांदाच केलं शतक, कुशल परेराचा सर्वात जलद शतकाचा विक्रम

श्रेयस अय्यर: एकेकाळी कर्णधारपदाचा दावेदार असलेल्या श्रेयस अय्यरला खराब फॉर्ममुळे टी-२० संघातून वगळण्यात आले. वनडेमध्ये त्याची कामगिरी चांगली होत राहिली आणि टी-२० मध्ये घसरण होत राहिली. आता वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. आता या संधीचा तो कसा फायदा घेतो हे पाहावे लागेल. ऑक्टोबर २०२२ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी-२० खेळला होता. श्रेयस अय्यरने गेल्या १२ डावांमध्ये केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत.

ऋषभ पंत: कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रचंड यश मिळवूनही, स्टार यष्टीरक्षक-फलंदाज टी-२० फॉरमॅटमध्ये हार्ड हिटिंग बॅट्समनच्या त्याच्या प्रतिमेनुसार जगण्यात अपयशी ठरला आहे. त्याने ६४ सामन्यांत तीन अर्धशतकांच्या मदतीने केवळ ९४० धावा केल्या आहेत. यादरम्यान पंतचा स्ट्राइक रेट १२७.१२ राहिला आहे. या मालिकेत तो एक किंवा दोन अर्धशतके झळकावून पुनरागमन करू शकतो.

शुभमन गिल: शुबमन गिलची वनडेतील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. वेस्ट इंडिजपाठोपाठ झिम्बाब्वेमध्येही त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. याशिवाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेत सहा सामन्यांत २६० धावा केल्या. यादरम्यान एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. आता टी-२० फॉरमॅटमध्ये शुभमनची कामगिरी कशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा – IND vs NZ: ‘यांना’ सारखा ब्रेक हवा, IPL चे ३ महिने काय.. राहुल द्रविडच्या विश्रांतीवर रवी शास्त्रींची सणसणीत टीका

उमरान मलिक: आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उमरान मलिकला भारताकडून खेळण्याची संधी आहे. उमरानने तीन टी-२० सामन्यात दोन विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान तो चांगलाच महागात पडला आहे. त्याचा इकॉनॉमी रेट १२.४४ आहे. उमरानला वेगवान तसेच योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. त्याला दुसरी संधी मिळाली आहे. ताशी दीडशे किलोमीटर वेगाने चेंडू फेकणाऱ्या उमरानसाठी ही चांगली संधी आहे.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ :

हार्दिक पंडय़ा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक/ उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक. 

Story img Loader