Yashasvi Jaiswal Century: सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (१३ जुलै) टीम इंडियाने पहिल्या दिवसाची धावसंख्या पहिल्या डावात ८० धावांपर्यंत मजल मारली. यशस्वीने शतक झळकावून अनेक विक्रम केले. त्याचवेळी रोहित शर्माने गेल्या काही डावातील निराशा मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत शतक केल्यानंतर मोठी खेळी खेळली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली. भारताच्या कसोटी इतिहासात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता विरोधी संघाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेण्याची ही पहिलीच वेळ होती. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पदार्पणातच शतक झळकावणारा यशस्वी हा भारताचा १७वा फलंदाज आहे. त्याआधी शेवटच्या पदार्पणाच्या कसोटीत श्रेयस अय्यरने भारताकडून शतक झळकावले होते. त्याने २०२१ मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १०५ धावा केल्या होत्या. लाला अमरनाथ हे भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारे पहिले भारतीय खेळाडू होते. त्याने १९३३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १८८ धावा केल्या होत्या. विंडीजमध्ये कसोटी पदार्पणात ५०+ धावा करणारा यशस्वी दुसरा भारतीय फलंदाज ठरला. १९७१ मध्ये दिग्गज सुनील गावसकर यांनी दोन्ही डावांत ५०+ धावा केल्या होत्या. जैस्वालने हा विक्रम करताच भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड पासून ते विराट कोहलीपर्यंत सर्व संघाने ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष केला. के.एस. भरत आणि इशान किशन यांनी उभं राहून त्याचे अभिवादन केले. हा सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

यशस्वी जैस्वालने रचला इतिहास

यशस्वीबद्दल बोलायचे झाले तर पदार्पणातच शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय सलामीवीर आहे. शिखर धवनने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये आणि पृथ्वी शॉने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटमध्ये केले होते. यशस्वीने परदेशी भूमीवर पदार्पण करताना पहिल्याच कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. एवढेच नाही तर वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात शतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने २०१३ मध्ये कोलकात्यात १७७ धावा केल्या होत्या. त्याचवेळी पृथ्वी शॉने २०१३ मध्ये राजकोटमध्ये १३४ धावा केल्या होत्या.

हेही वाचा: Yashasvi Jaiswal: कसोटी पदार्पणात शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल झाला भावूक; म्हणाला, “मी ज्या परिस्थितीतून…”

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये हे सहाव्यांदा घडले आहे जेव्हा दोन्ही सलामीचे फलंदाज शतक झळकावण्यात यशस्वी झाले आहेत. याआधी बांगलादेशविरुद्धच्या फतुल्ला कसोटी सामन्यात मुरली विजय आणि शिखर धवन या जोडीने भारतासाठी शेवटची कामगिरी केली होती. रोहित शर्मा आपले १०वे कसोटी शतक पूर्ण करून १०३ धावा करून तंबूत परतला. यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये भारताबाहेर रोहितचे हे दुसरे शतक ठरले. याआधी त्याचे परदेशातील पहिले कसोटी शतक इंग्लंडमध्ये झळकले होते.