मणिपूरमधील १८ वर्षीय खेळाडू रेक्स राजकुमार सिंह भारताच्या अंडर-१९ संघात निवड झाली आहे. भारतीय संघात स्थान मिळवणारा रेक्स हा मणिपूरचा पहिला खेळाडू आहे. रेक्स सिंह हा जलगती गोलंदाजी करतो. डिसेंबर २०१८ मध्ये रेक्स सिंह ११ धावांच्या मोबदल्यात दहा बळी घेत रेक्स सिंहने भारतीय क्रीडा विश्वाचे लक्ष वेधले होते. रेक्सने कामगिरीच्या बळावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) भारतीय संघात घेण्यास भाग पाडलं. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघात रेक्सची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी रेक्सची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये कूच बिहार ट्रॉफीत मणिपूर संघाकडून खेळताना रेक्सने प्रतिस्पर्धी अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला होता. त्याने ९.५ षटकांत ११ धावांच्या मोबदल्यात दहा बळी घेतले होते. १८ वर्षीय रेक्सला बीसीसीआयने या दमदार कामगिरीचे बक्षीस दिले आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली त्याला अंडर -१९ संघात रेक्सला संधी मिळाली आहे.
What a spell, 10 out of 10. Rex Singh from Manipur on pic.twitter.com/IPIkJKxQFH
— Paresh (@hi_paresh) December 14, 2018