List Of Players Who Takes Wicket Hat Trick In IPL : आयपीएलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत फलंदाजांसोबतच गोलंदाजांचाही मैदानात बोलबाला दिसून आला आहे. भारतीय गोलंदाजांशिवाय ओवरसीज खेळाडूंनीही छाप टाकली आहे. अनेक खेळाडू असे आहेत, जे आयपीएल खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चमकले आहेत. जसप्रीत बुमराहा आणि पांड्या ब्रदर्सशिवाय अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. विकेट हॅट्रिक घेणं कोणत्याही गोलंदाजासाठी मोठं यश असतं आणि आयपीएलमध्ये असं अनेक वेळा पाहायला मिळालं आहे.
आयपीएलमध्ये २००८ पासून २०१४ पर्यंत झालेल्या प्रत्येक सीजनमध्ये कोणत्या ना कोणत्या गोलंदाजाच्या पारड्यात विकेट हॅट्रिक पडली आहे. त्यानंतर २०१५ मध्ये विकेट हॅट्रिक घेण्यात गोलंदाजांना अपयश आलं होतं आणि २०१६ मध्ये पुन्हा विकेट हॅट्रिकवर नाव कोरलं गेलं. त्यानंतर २०१८ आणि २०२० मध्ये कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेऊ शकला नाही. अमित मिश्रा आणि युवरजा सिंग असे खेळाडू आहेत, ज्यांनी २ किंवा त्याहून अधिक वेळा विकेट हॅट्रिक घेऊन इतिहास रचला आहे. मिश्राने ३ आणि युवराजने २ वेळा विकेट हॅट्रिक घेतली आहे.
IPL इतिहासात विकेट हॅट्रिक घेणारे गोलंदाज
लक्ष्मीपती बालाजी (चेन्नई सुपर किंग्ज) विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब, 2008
अमित मिश्रा (दिल्ली डेयरडेविल्स) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, 2008
मखाया एंटीनी (चेन्नई सुपर किंग्ज) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 2008
युवराज सिंग (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर, 2009
रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स) विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2009
युवराज सिंग (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, 2009
प्रवीण कुमार (रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर) विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2010
अमित मिश्रा (डेक्कन चार्जर्स) विरुद्ध किंग्स XI पंजाब, 2011
अजीत चंदीला (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2012
सुनील नारायण (कोलकाता नाइटराइडर्स) विरुद्ध किंग्स XI पंजाब, 2013
अमित मिश्रा (सनरायजर्स हैदराबाद) विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2013
प्रवीण तांबे (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 2014
शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 2014
अक्षर पटेल (किंग्स XI पंजाब) विरुद्ध गुजरात लायंस, 2016
सॅमुएल बद्री (रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर) विरद्ध मुंबई इंडियन्स, 2017
एंड्रू टाई (गुजरात लायंस) विरुद्ध राइजिंग पुणे सुपरजायंट्स, 2017
जयदेव उनादकट (रायजिंग पुणे सुपर जायंट्स) विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 2017