मुंबई : खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या दडपणामुळे ७५ वर्षीय कीर्तिकर यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०११ पासून कीर्तिकर उपनगर कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदावर होते. परंतु कीर्तिकर यांच्यावर राष्ट्रीय क्रीडा संहितेची टांगती तलवार होती. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.

कुर्ला येथे बुधवारी रात्री झालेल्या उपनगर कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये कीर्तिकर यांचा राजीनामा संमत करण्यात आला. आता २८ जुलैला होणाऱ्या आगामी बैठकीत अध्यक्षपदाची रिक्त जागा भरण्यासंदर्भात कार्यवाही होऊ शकेल. कीर्तिकर यांचे पुत्र अमोल यांची अध्यक्षपदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये उपनगर कबड्डी संघटनेची पुढील निवडणूक असून, तोपर्यंत ते पदभार सांभाळू शकतील.